तोंडल्याचे फळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Ivy gourd health benefits in marathi

वेलीवर येणारे तोंडल्याचे फळ (Ivy gourd) बोटांएवढे लांब, अंगठ्याएवढे जाड, लंबगोल, हिरवट रंगाचे, टोकदार असून पिकल्यावर लाल होते. तोंडली दोन प्रकारात येतात. फिकट हिरवी व गर्द हिरवी तसेच कडू आणि गोड. तोंडल्यांची भाजी केली जाते. तोंडल्यांची भाजी गोडा मसाला व दाण्याचे कूट घालून अत्यंत रुचकर लागते. भरली तोंडली त्यांच्या आंबट चटणीमुळे जिभेला चव आणतात.

तोंडल्याचे फळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Ivy gourd health benefits in marathi

 • तोंडली गोड, पचण्यास जड, थंड, रक्तविकार, रक्तपित्त दूर करतात तसेच ती स्तंभक व रुची उत्पन्न करणारी असून मलावरोध व पोटात वायू भरणे आदी तक्रार वाढवतात.
 • कडू तोंडली तिखट, अग्नीप्रदीपक, अरुची, श्वास, खोकला दूर करतात. कडू तोंडल्यामुळे उलटी होते तसेच पांडुरोग, कफविकार, रक्तविकार यांमध्ये फायदा होतो.
 • मधुमेहाच्या रुग्णांसाठी तोंडल्याच्या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते.
 • तोंडल्यांच्या मुळाचे चूर्ण स्त्रियांना प्रदररोगामध्ये दिले जाते.
 • विंचवाचा दंश झाला असता कडू तोंडल्याचा रस द्यावा.

हे सुध्दा वाचा:मशरूम हे वजन कमी करण्यास मदत करतील, फक्त आहारात या पद्धतींचा समावेश करा

 • जिभेला भेगा पडल्या असतील तर तोंडली दाताखाली चावत त्यातला रस काही काळ तोंडात घोळवत ठेवावा.
 • दुखणाऱ्या, ठणकणाऱ्या जखमेवर तोंडल्याच्या पानांचा रस काढून चोळावा.
 • गळू झाले असता त्यावर तोंडल्याच्या पानांचा रस लावावा किंवा पानांचे पोटीस बांधावे, गळू पिकून फुटते.
 • लघवीच्या जागी जळजळत असेल तर तोंडल्याची 20 ग्रॅम पाने अर्ध्या लीटर पाण्यात उकळवून त्याचा काढा मधातून घ्यावा.
 • तोंडल्याच्या मुळाची साल वाटून केलेला रस रेचक म्हणून फायदेशीर ठरतो.
 • तोंडली किंवा त्याची भाजी वरचेवर खाल्ल्याने जिभेला जडत्व येते. तोतरेपणा, बोबडेपणाचा त्रास असणाऱ्यांनी तोंडल्याची भाजी खाणे टाळावे. तोंडल्याच्या सेवनाने मलावरोध होतो तसेच पोटात वायू धरतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button