हळदीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Health benefits of turmeric in marathi

आहार, आरोग्य व धार्मिक कार्यामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे हळद. मंगलकार्यापासून स्वयंपाकापर्यंत हळद उपयोगात येते. कफ, पित्त व वात या तिन्ही दोषांवर हळदीचा फार उपयोग होतो. हळदीचा ‘रंग’ म्हणूनही उपयोग होतो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ‘हळद’ ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी अशा गोष्टींपैकी एक आहे.

हळदीचे रोप सुगंधी असते. केळीच्या पानासारखे दोन्ही बाजूला चिकट, पांढुरके डाग असलेले असे हे रोपही फार उपयोगी असते. दुधामध्ये आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हळदीचे पान घातल्याने सुगंध येतो. या रोपाच्या मुळांना जमिनीमध्ये गाठी निर्माण होतात. या पिवळट गाठीपासूनच हळद बनते.

हळदीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Health benefits of turmeric in marathi

हळदीचे रोप सुगंधी असते. केळीच्या पानासारखे दोन्ही बाजूला चिकट, पांढुरके डाग असलेले असे हे रोपही फार उपयोगी असते. दुधामध्ये आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हळदीचे पान घातल्याने सुगंध येतो. या रोपाच्या मुळांना जमिनीमध्ये गाठी निर्माण होतात. या पिवळट गाठीपासूनच हळद बनते.

  • हळद कडवट, शुष्क, गरम, तिखट, रुक्ष असून कफ, पित्त, रक्तविकार, अपचन, कृमी, व्रण, त्वचादोष, सूज या विकारांवर उपयोगी पडते.
  • हळदपूड आणि तीनपट गूळ व तीळ यांचे मिश्रण सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातून घेतले असता लघवी जास्त होणे थांबते.
  • हळद व उडीद निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर नाकातोंडाने घेतला असता उचकी बंद होते.
  • सर्दीमुळे डोके जड झाले असता हळदीचे तुकडे विस्तवावर गरम करून त्याचा धूर नाकातोंडाने ओढून घ्यावा. त्यामुळे नाकातून पाणी बाहेर पडते. सर्दीचा भर कमी होतो. डोके हलके झाल्यासारखे वाटते. गरम दुधामध्ये हळद घालून प्यायल्यास सर्दी व कफावर नियंत्रण येते. तसेच घसा दुखणे, खवखवणे यांवरही फायदा होतो.
  • हळद व वावडिंगाचे चूर्ण समप्रमाणात गुळातून घेतल्याने पंधरावीस दिवसात जंताचे प्रमाण कमी होते.
  • हळदपूड व गूळ गरम दुधातून घेतल्याने आवाज बसणे यांवर फायदा होतो.
  • हळकुंड लोण्यामध्ये वाटून किंवा कोरफडीच्या गरामध्ये वाटून त्याचा लेप मूळव्याधीच्या मोडावर लावला असता मोड़ नरम पडतो.
  • खरूज झाली असता हळद व कडुनिंबाची पाने वाटून त्याचा लेप द्यावा. खरजेमुळे अंगाला खाज येत असेल तर १०-१२ कडुनिंबाची पाने वाटावी. त्यात थोडी हळद घालून ते चाटण पाण्याबरोबर घ्यावे.
  • फोड फुटून पू येत असेल तर हळदीची पूड त्यावर दाबून ठेवावी. जंतुसंसर्ग न होता व्रण भरून येतो.
  • ‘इसब’ झाला असता जखम पाण्याने धुऊन त्यावर हळदीचा लेप लावावा.
  • मार लागून रक्त साकळले असता हळद उगाळून, गरम करून दुखऱ्या जागी लावली गोठलेले रक्त फाकते.
  • हळदीमध्ये जंतुनाशकत्व हा गुणधर्म असल्याने कोणतीही जखम झाली असता तेथे त्वरित हळदपूड लावावी.
  • हळदीमध्ये सौंदर्यवर्धक गुण असल्याने दुधावरची साय व हळद कालवून रात्री झोपताना चेहऱ्यावर त्याचा लेप लावावा व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. असे नियमितपणे केल्याने वर्ण उजळ होतो. गरम दुधामध्ये हळकुंडाचा तुकडा वाटावा. हे मिश्रण अंगाला चांगले चोळून घ्यावे. व त्यानंतर स्नान करावे. त्वचा तजेलदार होते.
  • मुकामार लागल्यास तिथे तिळाच्या तेलात हळद कालवून त्याचा लेप द्यावा.

हे सुध्दा वाचा:आले खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • शिकेकाई पावडरमध्ये हळद पावडर मिसळून डोक्यास लावली असता डोके स्वच्छ होते. उवा, लिखांचे प्रमाण कमी होते.
  • चमचाभर हळद पेलाभर पाण्यात उकळवून गार करावी. ह्या पाण्याच्या घड्या डोळ्यावर ठेवल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात.
  • दातांचे रोग झाले असता हळद, मीठ व खायचा सोडा एकत्र करून दात घासावेत किंवा ओवा व हळद तव्यावर भाजून त्याची वस्त्रगाळ पूड दंतमंजन म्हणून वापरल्याने खूप फायदा होतो. हळद, ओवा, लवंग यांचे चूर्ण दातावर चोळल्यानेही दातदुखी बरी होते.
  • हळद व तुपाचे चाटण चाटावयास दिल्याने आमांश, मुरडा, अतिसार यांमध्ये फायदा होतो.
  • चिखल्या झाल्या असता गोडेतेलामध्ये हळद घालून चोळावी.
  • चंदन उगाळून त्यात हळद व लोणी एकत्र करून त्यांचे मिश्रण मुरमे, पुटकुळ्या, वांग यांवर लावावे.
  • हळद पाण्यात कालवून त्याचा लेप कानशिले दुखत असतील तेव्हा लावल्यास, फारच आराम मिळतो.
  • गरम दुधात मिरे व हळद घालून थंडी वाजून येणारा ताप उतरतो.
  • टॉन्सिल्सना सूज आली असता हळद मधात कालवून सूज आलेल्या भागावर लावावी.
  • आवळ्याचा रस मध व हळद घालून प्यायल्याने लघवीतून पू जाणे बंद होते.
  • हळकुंडे मंद अग्नीवर गरम करून दळून त्यात साखर घालावी. हे चूर्ण काही दिवस दररोज घेतल्याने मधुमेह व प्रमेह आदी विकारामध्ये फायदा होतो.
  • कोरफडीच्या गरामध्ये हळद वाटून त्याचा लेप स्तनांना लावला असता स्तनांवर आलेली सूज बरी होते.
  • हळद, तुरटी व चिंचेची पाने समप्रमाणात घ्यावी, कुटावी. एका पुरचुंडीमध्ये “हे मिश्रण बांधून तव्यावर शेकावे व त्याचा शेक डोळ्यांना दिला असता डोळे लाल होणे यांसारख्या विकारांवर फायदा होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button