टोमॅटो केचप हे एकेकाळी औषध म्हणून विकले जायचे | Tomato ketchup history in marathi

मित्रांनो टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप (Tomato Ketchup) खाणारे बरेच लोक आहेत. एखाद्या पदार्थ बरोबर केचप खाल्ल्याने त्याची टेस्ट आणखी वाढते. बरेच लोक रोजच्या जेवणासोबत केचपचा वापर करतात. पण मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का? की 200 वर्षांपूर्वी टोमॅटो केचप औषध म्हणून विकले जात होते. अमेरिकेत या टोमॅटोची जाहिरात म्हणजे जणू काही गंभीर आजारावर उपाय ठरला होता. पण या प्रकारच्या मार्केटिंग तंत्रामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला होता.

टोमॅटो केचप हे एकेकाळी औषध म्हणून विकले जायचे | Tomato ketchup history in marathi

1800 च्या दशकाच्या सुरुवातीस, केचप हे मशरूम आणि माशांपासून बनवले जात होते.पण त्याकाळी टोमॅटो ही एक विषारी भाजी मानली जात होती. 1834 मध्ये डॉ. जॉन कुक बेनेट (John Cooke Bennett) यांनी टोमॅटो केचपमध्ये टोमॅटो टाकण्यास सुरुवात केली आणि लोकांना सांगितले की त्यांनी संशोधन केले आहे. ज्यावरून त्यांना कळले की, टोमॅटोमध्ये अनेक गंभीर आजार बरे करण्याची शक्ती आहे.

जॉनने लोकांना सांगितले होते की, डायरिया, कॉलरा, कावीळ आणि अपचन यांसारखे आजारही टोमॅटोने बरे होऊ शकतात. त्यांनी लोकांना टोमॅटो बारीक करून चटणीसारखे बनवून त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. जेणेकरून लोकांना त्याचा फायदा मिळू शकेल. त्यांचे संशोधन हे अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांनीही तपशीलवार प्रसिद्ध केले होते.

त्याच वेळी, अलेक्झांडर माइल्स ( Alexander Miles) नावाच्या व्यावसायिकाने टोमॅटोबद्दलचा हा दावा वाचला आणि त्याला वाटले की तो आपण आपल्या व्यवसायात वापरू शकतो.

माईल्स त्याकाळी ‘अमेरिकन हायजीन पिल’ (American hygiene pill) नावाचे पेटंट औषध विकायचे, त्याने जॉनशी हातमिळवणी करून टोमॅटो केचपचे औषध म्हणून विकायला सुरुवात केली आणि त्याला ‘टोमॅटोचा अर्क’ असे नाव दिले. त्याचे औषध हे गोळ्याच्या स्वरूपात तसेच सिरपमध्ये होते जे फक्त आजचे केचप होते.

हे सुध्दा वाचा:- श्रीलंका देशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

या नव्या बिजनेसमुळे अमेरिकेत दहशत निर्माण झाली आणि तिथे केचपचा खप वाढला. इतर अनेक व्यावसायिकांनीही औषध म्हणून केचप विकायला सुरुवात केली.

पण जेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधन केले तेव्हा त्यांना आढळले की, या सर्व केवळ अफवा आहेत. हळूहळू अमेरिकेत पसरलेले केचप खरेदीचे वेड अखेर हळू हळू शांत झाले, पण या अफवेचा फायदा असा झाला की टोमॅटो ही विषारी भाजी नाही हे लोकांना समजले.

आजच्या काळात जेव्हा टोमॅटोवर संशोधन केले गेले तेव्हा अनेक फायदे दिसून आले आणि आता हे माहित आहे की जॉनने केलेले दावे पूर्णपणे चुकीचे नव्हते, जरी ते अतिशयोक्तीपूर्ण होते, परंतु आज लोकांना समजले आहे की, टोमॅटो हे हृदय समस्या आणि कर्करोगसाठी फायदेशीर आहे.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button