आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी या 5 पॉवरफूल टिप्स | How to make decisions in life (in Marathi)

आपण आपल्या आयुष्यात घेतलेले छोट्यात छोटे निर्णय आपल्या करिअरवर विशेष प्रभाव टाकत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा लागतो. पण निर्णय घेताना आपण गोंधळलेला मनस्थितीत असतो. अशावेळी नेमकी कोणत्या बाजूचे ऐकावे हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. म्हणून जर तुम्ही देखील अशा गोंधळून गेलेल्या मनस्थितीत असाल तर या 5 टीप्स (making decisions in life essay) नक्की फॉलो करा.

आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी या 5 पॉवरफूल टिप्स | How to make decisions in life (in Marathi)

घाई करू नका

आयुष्यात कोणताही निर्णय घेताना स्वतःला वेळ द्या. घाई करणे हे चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे निर्णय घेताना अनावश्यक घाई करू नका व पूर्ण वेळ द्या आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या.

तुमचा निर्णय घ्या, त्याची जबाबदारी स्वीकारा

आपल्यातील बहुतेक जण चुकीच्या निर्णयाला इतरांना जबाबदार धरतात. हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. आपण घेतलेल्या निर्णयामध्ये जर अपयशी ठरलात तर आपण दुसऱ्याला दोष देऊन लागतो. हे दुर्बलतेचे लक्षण आहे. त्यामुळे काहीही झाले तरी तुमचा निर्णय पूर्णपणे स्वतःचा असेल त्याची जबाबदारी देखील स्वतःची असेल त्याची खात्री करा.

आतला आवाज ऐका

आयुष्यात कोणताही निर्णय घेताना स्वतःत सर्वात आधी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. या आधारावर घेतलेल्या निर्णय दीर्घकालीन प्रभाव पाडतात. उदाहरण द्यायचे असल्यास, तुमच्या वैयक्तिक जीवनातील मोठे निर्णय जसे की लग्न,नोकरी, करिअर इत्यादी. या निर्णयात अशावेळी आपण आपल्या अंतर्मनाला साद घालावी.

आतल्या आवाजाचे विश्लेषण

आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास तुमच्या अंतर्मनाचे ऐका व नंतर तुमच्या आतल्या आवाजाचे अर्थात अंतर्मनाचे विश्लेषण करा. विचार करा की मी असा विचार का करतो? मला हे का हवे आहे किंवा मला हे का नकोय? इत्यादी जर आपण भूतकाळातील अनुभवावर आधारित निर्णय घेत आहोत. तर बाह्य परिस्थिती अजूनही तशीच आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा:- करियर निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उपलब्ध माहितीची निकष

आपल्या आजूबाजूला असलेल्या उपलब्ध माहितीच्या निकषावर तुमचा निर्णय तपासा. उदाहरण द्यायचे असल्यास तुम्ही सचिन तेंडुलकरला आयुष्यात तुमचा प्रेरणास्थान मानत असाल तर त्याने रचलेल्या इतिहासाकडे केवळ पाहत राहू नका. त्यांनी घेतलेले त्यासाठीचे प्रचंड परिश्रम, त्याच्या त्यासाठीचा संघर्ष, तडजोड देखील पहा. आपल्या बहुतांलातील शेकडो अपयशाच्या कहाण्या या यशस्वी करिअरची सुरुवात करून देतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button