नारळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Do you know the benefits of coconut?

नारळाचे झाड ‘कल्पवृक्ष’ म्हणून ओळखले जाते. नारळाचा दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याच प्रकारे उपयोग होतो.

नारळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Coconut benefits in marathi

  • कोवळ्या नारळाला शहाळे म्हणतात. यात खोबरे कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असते. मधुर व चविष्ट असलेले हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक असते. थंड, वीर्यवर्धक, तृषाशामक, पित्तशामक असे हे पाणी मूत्रमार्ग स्वच्छ करणारे आहे.
  • कोवळा नारळ पित्तप्रकोप दूर करतो. जून नारळ पित्तकारक, जुलाबावर उपयोगी ठरतो.
  • नारळाचे तेल थंड, पित्तशामक, थंड, कफहारक, केशवर्धक असते. केशतेल म्हणून या तेलाचा उपयोग होतो.
  • नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्यायल्याने लघवीचा दाह कमी होतो.
  • थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळेस ओले खोबरे व गूळ एकत्र करून खाल्ल्याने शरीराला पुष्टी येते तसेच रक्तामधील उष्णताही वाढते.

हे सुध्दा वाचा:वजन वाढविण्यासाठी हिवाळा ऋतू सर्वात चांगला

  • नारळाची शेंडी जाळून त्याची राख मधात घालून खाल्ली असता उलटी तसेच उचकी लागण्याचे प्रमाणही कमी होते.
  • मूत्राशय स्वच्छ ठेवणे, जुलाबांवर गुणकारी, वात, पित्तप्रकोप, रक्तपित्त दूर करणे, हे नारळाचे फायदे असून हृदयरोगावरही तो फायदेशीर ठरतो.
  • ओल्या खोबऱ्याबरोबर साखर खाल्ली असता रक्त पडायचे थांबते तसेच शरीरातील उष्णतेवर नियंत्रण आणले जाते. ओल्या नारळाचे दूध शक्तिवर्धक असते.
  • नारळाच्या पाण्याचा मूतखडा किंवा अन्य मूत्रविकारांमध्ये गुण येतो. हे पाणी तृषाशामक असून मलशुद्धीकारकही आहे. तसेच त्याच्या नियमित सेवनाने पोटातील कृमीही नाहीसे होतात.
  • सुके खोबरे मलावरोधक आहे. झोपण्यापूर्वी सुकेखोबरे साखरेबरोबर खाल्ल्याने वीर्यवर्धक ठरते मात्र, ते शुष्क व पित्तवर्धक असल्याने त्याचा अतिरेकी वापर टाळावा. त्यामुळे खोकला, श्वास लागणे अशा व्याधी उद्भवतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ