मोती साबणाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | Moti soap company history in marathi

दिवाळी सण आला की दूरचित्रवाणीवर अर्थात टीव्हीवर उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. ही जाहिरात ऐकू येते. त्यामुळे दिवाळी आली आणि या वाक्याची आठवण झाली नाही, असे कधीच होत नाही. त्यामुळे दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य भाग म्हणजे मोती साबण (Moti soap). मोती साबणाची गोष्ट सुद्धा तिमिरातूनी तेजाकडे अशीच आहे.

दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात साजरी करत असलेली दिवाळी आणि मोती साबण हे एक समीकरणच आहे. 70च्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली. मोती साबण अनेक अर्थाने वेगळा होता. कारण की, गुलाब -चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच शाही थाट दाखविला. मोती साबणाने सतत स्वतःला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेची जोडून ठेवले.

मोती साबणाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | Moti soap history in marathi

1993 मध्ये टाटा ऑइल मिल्स ही तात्कालीन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये समाविष्ट झाली. मोती साबणाला त्यावेळी 25 रुपयांच्या किमतीमुळे प्रीमियम साबण म्हणून ओळखले जायचे. चंदनाचा सुगंध तसेच साबणाचा आकार या गोष्टी मोती साबणाच्या आकर्षित करणारे केंद्रबिंदू ठरले आहेत.

विशेष म्हणजे मोती साबणाची क्रेझ ही आपल्या महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही आहे. विशेष म्हणजे या राज्यांच्या काही भागात अभ्यंग स्नानाला खूप प्रमाणात महत्त्व आहे. त्यामुळे परिणामी या तीन राज्यात मोती साबणाला खूप जास्त मागणी आहे. दिवाळी या सणासोबतच आणखी इतर धार्मिक विधींच्या वेळी सुद्धा मोती साबण वापरला जावा यासाठी कंपनीने बरेच प्रयत्न केले. 2013 साली कंपनीने काही राज्यात मोती साबणाचा खप वाढविण्यासाठी कॅम्पेन्स सुद्धा चालवले होते.

एक काळ असा होता जेव्हा कितीही हालाखीची परिस्थिती असली तरी घरातील कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबुन विकत घेताना विचार करायची नाही. आपल्या दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा.

हे सुद्धा वाचा:- हिंदू नववर्ष भारतभर कसं साजरं केलं जातं?

सुरुवातीच्या काळात ज्या जाहिरातींमधून मोती साबणाला लोकांपर्यंत आणले गेले त्यात साबण मोत्यांच्या कोंदणात ठेवलेला असायचा. त्यामुळे लोकांनाही कल्पना खूप आकर्षक वाटली. पण मोती साबणाची (Moti soap) आठवण ही दिवाळीतच का येते? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर अभ्यंग स्नान हे उठण्याशिवाय केले जात नाही. उटणे ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे. अभ्यंग स्नान करताना आधी उटणे लावले जाते.

1990 च्या दशकांमध्ये बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोती साबणाला तग धरण्यासाठी कंपनीने उठण्याचा फ्लेवर असलेला साबण अशी जाहिरात केली. दिवाळीचा दिवा लावतांना बाजूला असलेल्या मोती साबणामुळे अशी प्रतिमा लोकांच्या मनात नकळत तयार झाली की मोती साबण हा खास दिवाळीसाठीच बनवण्यात आला आहे.

1990 च्या दशकातील प्रत्येकजण हा मोती सामनाकडे एक बालपणीची आठवण म्हणूनच बघतो आणि मोती साबण आठवणीने विकत देखील घेतो. मित्रांनो तुम्ही पण मोती साबण वापरता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button