वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स | Some important tips to remember the reading

बऱ्याच लोकांना वाचलेले लक्षात राहत नाही तसेच जे काही वाचले ते काही तासातच विसरून जातात. या समस्येसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स | Some important tips to remember the reading

मोठ्याने वाचा

आपण जे काही वाचत आहात ते आपण मनात वाचण्याऐवजी मोठ्याने वाचा. असे केल्यामुळे तुम्ही जे वाचत आहात ते तुमच्या कानावर पुन्हा येईन. वाचलेले आणि ऐकलेले डोक्यात फिट बसेल तसेच लिहिताना सोपे जाईल.

नोंदणीसाठी काही गोष्टी जवळ ठेवा

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात लोक डायरी, पेन, वही सोबत ठेवत नाहीत. मोबाईल व लॅपटॉप मध्ये नोट्स कॉपी करून ठेवणे खूप सोपे आहे परंतु हे काही फायदेशीर नाही. मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये नोट्स काढून ठेवल्यावर आपण ते पटकन विसरूनही जातो. परंतु जेव्हा आपण स्वतः नोट्स काढतो त्यामुळे त्या विषयाची माहिती स्मरणात ठेवणे सोपे होते.

एकाच दिवशी जास्त विषय

एका दिवशी एकच प्रकारचा विषय वाचला तर कंटाळा येतो आणि जे वाचले तेही व्यवस्थित लक्षात राहत नाही म्हणून थोडा थोडा वेळ प्रत्येक विषयाला द्या.

हे सुध्दा वाचा:- दररोज पहाटे जाग येण्यासाठी काही निवडक महत्त्वाचे नियम

एकावेळी एकच पर्याय निवडा

लोकांना कोणत्याही विषयाची जास्तीत जास्त माहिती हवी असते. त्यासाठी ते एकाच वेळी बऱ्याच ठिकाणाहून माहिती घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतात. जसे की, पुस्तक, इंटरनेट, वर्तमानपत्र, मॅक्झिन इत्यादी. यामुळे ते कोणत्याही माध्यमातून नीट वाचन करू शकत नाही. एका वेळी कोणत्याही एकाचे वाचन करा आणि हो वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळवायची असेल तर एक पर्याय पूर्ण करून मगच दुसरा पर्याय निवडा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button