सुरण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Yam health benefits in marathi

सुरण (Yam) हा जमिनीमध्ये वाढणारा कंदप्रकार आहे. सुरणाच्या दोन जाती आढळतात. गोड सुरण व खाजरा सुरण, गोड सुरण चवदार, गुणकारी असतो. याचा उपयोग आपण आहारामध्ये करतो. खाजेरा सुरण गुळगुळीत असतो. याच्या सेवनाने घशाला व तोंडाला खाज सुटते. याचा वापर करताना त्यात चिंचेचे किंवा कोकमाचे पाणी करून त्यात सुरणाच्या फोडी भिजवून ठेवल्याने त्यांच्यातील खाजरेपणा कमी होतो.

खाजेरा सुरण औषध म्हणूनही वापरण्यात येतो. सुरणाची भाजी अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असते. सुरणाची भाजी केली जाते. तसेच सुरणाचे वाफवून किसून पीठ तयार केले जाते व त्यापासून शिरा, खीर, पोळी, पुरी आदी पदार्थ बनवले जातात. सुरणाचे लोणचेही काही ठिकाणी बनवले जाते. सुरणाचे काप काढून ते तळून त्यावर मिरपूड व मीठ टाकून खाल्ले जातात.

सुरण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Yam health benefits in marathi

  • गोड सुरण रुचकर, उष्ण, तुरट, वायू व कफनाशक, तिखट, अग्नीप्रदीपक, रक्तपित्तप्रकोपक आहेत तर खाजेरा सुरण रुचकर, तिखट, तुरट, दीपक, पाचक, पित्तकारक व दाहक आहेत.
  • सुरणाचे काप काढून तुपात तळून खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास बरा होतो.
  • सुरणाचे काप सुकवून त्याचे चूर्ण तुपात भाजावे व त्यात साखर घालून खाल्ल्याने न पचलेला कच्चा रस पचला जातो.
  • खाजरा सुरण कृमीनाशक असून खोकला, उलटी, शूळ आदी विकारात नेहमीच गुणकारी ठरतो.
  • अशक्त माणसाला सुरण वाफवून खाऊ द्यावा.

हे सुध्दा वाचा:बटाटे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • आठवड्यातून दोनदा सुरणाची भाजी खाल्ली असता मूळव्याधीचा त्रास कमी होतो. बद्धकोष्ठता दूर होते (सुरण मूळव्याधीमध्ये गुणकारी असला तरी त्याचे अतिरेकी सेवन टाळावे).
  • सुरणाची साजूक तुपामध्ये भाजी करून खाल्ल्याने आतड्यांच्या रोगामध्ये आराम पडतो, शौचास साफ होते. तसेच यकृताची कार्यक्षमता वाढते.
  • जीवनसत्त्व असलेला सुरण नायटा, रक्तपित्त, कीड असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर नाही.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button