बटाटे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Potato health benefits and side effects in marathi

मित्रांनो भारतातच नव्हे तर जगभर बटाट्याची भाजी जितकी खाल्ली जात असेल तितकी दुसरी कोणतीही भाजी खाल्ली जात नाही. अतिपरिचयात देखील अवज्ञा न होणारी पृथ्वीतलावरील एकमेव गोष्ट म्हणजे बटाटा (Potato). भारतात अनेक ठिकाणी बटाट्याचे पीक येते. बटाट्याला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. लंबगोल, मऊशीर लव असलेली ही पाने त्यांवरील निळ्या, पांढऱ्या व तुरेदार फुलांमुळे आकर्षक दिसतात.

मोठे, लांब, डोळे खोल नसलेला, वाफवून सोलल्यावर पांढरा दिसणारा बटाटा चांगल्या प्रतीचा समजला जातो. काही बटाटे लालसर रंगावर असतात. ते खूप पौष्टिकही असतात. जगात असे एकही स्वयंपाकघर नसेल जेथे बटाट्याची भाजी होत नसेल इतक्या सढळपणे बटाटा वापरला जातो.

कधी प्रमुख भाजी म्हणून तर कधी इतर प्रमुख भाज्यांबरोबर दुय्यम भाजी म्हणूनही बटाटा पदार्थांची चव वाढवतो. सुकी भाजी, काचऱ्या, रसभाजी, वडे, खीर, कीस, वेफर्स, शिरा, वड्या आदी अनेक पदार्थामध्ये बटाटा वापरला जातो. उपवासाच्या दिवशी बटाट्याला फार मोठा मान मिळतो. बटाटा उपवासाच्या दिवशी फराळी पदार्थ म्हणून उपयोगात येतो. बटाटे वाफवून त्यांचे केलेले पीठही आहारामध्ये वापरता येते.

बटाटे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Potato health benefits and side effects in marathi

  • बटाटे रुक्ष, थंड, गोड, मलमूत्रकारक, रक्तपित्तहारक, पचण्यास जड असून कफ व वायू उत्पन्न करणारे, शक्तिवर्धक, वीर्यवर्धक व अल्प प्रमाणात अग्नीप्रदीपक आहेत.
  • रोज एक बटाटा विस्तवावर भाजून सोलावा. बारीक कुसकरावा. त्यात गाईचे तूप, साखर व दूध घालून लहान मुलांना दिल्यास त्यांच्या शरीराचे बल वाढते, पुष्टी येते. एक उत्तम टॉनिक म्हणून त्याचा उपयोग होतो.
  • जेथे भाजले असेल तेथे पडलेल्या व्रणावर बटाट्याची साल चोळल्याने भाजल्याचा दाह कमी होतो.
  • ज्या जागी एक्झिमा झाला असेल तेथे बटाट्याचा कीस चोळावा.

हे सुध्दा वाचा:कोबी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • चेहऱ्यावरील तेलकटपणा वाढला असल्यास बटाट्याचा रस काढून त्यात मक्याचे किंवा मसूराचे पीठ जाडसर कालवून त्याचा चेहऱ्यावर लेप करावा. लेप सुकल्यावर काही वेळाने तो धुऊन काढावा. चेहऱ्यावर तजेला येतो.
  • ज्यांना वायूविकाराचा त्रास जाणवत असेल, ज्यांना मधुमेहाचा विकार असेल तसेच ज्वर, मलावरोध, कंड सुटणे, अतिसार, आतड्यांचा क्षण, मूळव्याध, अपचन, त्वचारोग पोट फुगणे, अग्निमांद्य, वातप्रकोप आदी विकारांनी ग्रासलेल्या लोकांनी बटाट्याचे सेवन आपली प्रकृती पाहूनच करावे अन्यथा फार सेवन करू नये.
  • नरम पडलेला, दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येणारा बटाटा खाणे टाळावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button