तणाव कमी करण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स! |Try These Simple Tips to Reduce Stress

चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.तणाव जास्त दिवस राहिल्यास चिंतेचे रूप धारण करत. आणि यामुळे मानसिक एकाग्रता कमी होते. डोकेदुखी सुद्धा होते यामुळे अनेक अडचणी सुद्धा येतात.एका सर्वेनुसार 74% भारतीयांनी तणावाविषयी तर 88 टक्के लोकांनी तणावाची तक्रार सांगितली आहे. आणि हा खूप मोठा आकडा आहे.

तणाव वाढल्यामुळे थकवा येतो. तणावामुळे अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते, चिडचिडेपणा होतो आणि संताप वाढतो आणि यामुळे आरोग्य बिघडते. या व्यतिरिक्त अनेक मानसिक आजार सुद्धा होतात. डोकेदुखी, मायग्रेन, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ॲसिडिटी, अल्सर इत्यादी. यामुळेच आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा तणाव नक्कीच कमी होईल.

कोणत्या आहेत त्या टिप्स | Try These Simple Tips to Reduce Stress

व्यायाम करा आणि हेल्दी खा

तुमच्या रोजच्या आहारात चांगलं हेल्दी खा आणि सकाळी नक्की व्यायाम करा. तसेच जेवण झाले की घरातल्या घरात फिरत रहा.किंवा एखाद्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटी बद्दल क्लासेस लावा. यामुळे एंडोर्फिनची पातळी वाढते आणि तणाव कमी होतो. यासोबतच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

रोजच रुटीन मध्ये बदल करा

रोजच्या सवयी बदलल्यानंतर तुमचं कामात मन लागेल. कारण रोज एकच काम करून आपण बोर होतो आणि कामात मन लागत नाही. जर तुम्ही तुमचं रोजचं रुटीन बदलल तर तुमचा तणाव नक्कीच कमी होईल.

मेडिटेशन करा

जर तुम्हाला तणाव कमी करायचा असेल तर दिवसातून थोडावेळ स्वतःसाठी देऊन तुम्ही ध्यान करा. ध्यान करण्याआधी डोळ्यातील विचार कमी करा आणि आपल्या स्वतःकडे ध्यान केंद्रित करून मेडिटेशन करा. तुम्ही मेडिटेशनच्या व्हिडीओ ऑनलाइन बघू शकता किंवा आरोग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button