‘मार्जिन ट्रेडिंग’ म्हणजे काय? सविस्तर पणे जाणून घेऊया.

मित्रांनो या पहीलेच्या पोस्ट मध्ये आपण गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यातील फरक काय हे जाणून घेतलं. आता आपण मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून घेऊयात.

मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय? | What is Margin trading in marathi

साधारणतः एखादा शेअर खरेदी करण्यासाठी तेवढी रक्कम आपल्या बँक खात्यात असायला हवी आणि याउलट एखादा शेअर विकायचा तर तो शेअर आधी आपल्या डिमॅट खात्यात असायला हवा हा अगदी सोपा तर्क आहे. परंतु आपल्याकडे पुरेसे पैसे

नसताना किंवा आपल्याकडे शेअर नसताना खरेदी-विक्रीचा व्यवहार केला तर अगदी त्याच्याउलट आणखी एक व्यवहार करून व्यवहाराचं चक्र (सेटलमेंट सायकल) पूर्ण करावं लागतं. ही सेटलमेंट सायकल पूर्ण करताना, शेअरची किंमत आपल्या मनाप्रमाणे वर किंवा खाली गेली तर त्याचा आपल्याला फायदा होतो, अन्यथा तोटा सहन करावा लागतो.

असे व्यवहार करताना व्यवहाराच्या एकूण रकमेच्या काही टक्के रक्कम ‘मार्जिन’ म्हणून ब्रोकरकडे ठेवावी लागते.’मार्जिन’ म्हणून ब्रोकरकडे ठेवावी लागते. तिला ‘मार्जिन मनी’ म्हणतात. मार्जिन ट्रेडिंग हे दोन प्रकारचे असतं ‘बायिंग ऑन मार्जिन’ आणि ‘सेलिंग ऑन मार्जिन’.

हे वाचा- गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यातील फरक काय?

बायिंग ऑन मार्जिन म्हणजे काय ? | What is Buying on Margin in marathi

असं समजा की, एखाद्या गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात 500000 रुपये आहे आणि त्याला 100 रुपये बाजारभाव असलेल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहेत. नेहमीच्या व्यवहाराच्या नियमांप्रमाणे हा गुंतवणूकदार 100 रुपयांचे 5000 शेअर्स खरेदी करू शकतो. ज्या दिवशी त्याच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील त्या दिवशी त्याच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये जातील. आता हा व्यवहार मार्जिन ट्रेडिंगनुसार कसा होतो ते पाहूयात. असे समजूयात की,या व्यवहाराचं मार्जिन 20% आहे. अशा वेळी, 500000 च्या मदतीने ती व्यक्ती

100 रुपये बाजारभाव असलेले 25000 शेअर्स खरेदी करू शकते. (हा व्यवहार 25 लाख रुपयांचा होईल आणि त्याच्या 20 टक्के रक्कम म्हणजेच 5 लाख रुपये तो मार्जिन मनी म्हणून देईल.) या व्यवहारात शेअरचा बाजारभाव सेटलमेंट कालावधी संपण्यापूर्वी 110 रुपये झाल्यास त्या गुंतवणूकदाराला 250000 रुपयांचा फायदा होईल.0आपल्या लक्षात येईल की, मार्जिन ट्रेडिंगच्या मदतीने कमी रक्कम गुंतवून अधिक फायदा मिळवता येतो. अर्थात आपला अंदाज चुकला आणि विरुद्ध दिशेने शेअरचा बाजारभाव गेला तर मात्र मोठा तोटा होऊ शकतो, कारण कोणत्याही परिस्थितीत सेटलमेंट कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला तो व्यवहार संपवावा लागतोच.

सेलिंग ऑन मार्जिन म्हणजे काय? | What Selling on margin in marathi

ज्या वेळी गुंतवणूकदाराला एखाद्या शेअरचा भाव नजीकच्या काळात खाली जाईल असं वाटतं तेव्हा तो सेलिंग व मार्जिन हा व्यवहार करतो. या व्यवहारात आपल्याकडे नसलेले शेअरसुद्धा विकता येतात. यासाठी ठराविक रक्कम मार्जिन मनी म्हणून ब्रोकरकडे ठेवावी लागते. गुंतवणूकदाराच्या अंदाजाप्रमाणे शेअरचा भाव कोसळला तर त्याला फायदा होतो. मात्र त्याच्या अंदाजाच्या विरुद्ध दिशेने बाजारभाव गेला तरी त्याला तो व्यवहार पूर्ण करावाच लागतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button