सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘तब्बू’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Tabu Biography in Marathi

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम फातिमा हाशमी अर्थात तब्बू (Tabu) यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 ला हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जमाल हाशमी व आईचे नाव रिजवाना हाशमी होत.

तब्बू यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथील सेंट एन.एस विद्यालय हैदराबाद येथून पूर्ण केले व पुढील शिक्षण मुंबई मधील सेंट जेवियर्स महाविद्यालयातून पूर्ण झाले. त्याचं बरोबर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी घेतली.

तब्बू यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण हे देव आनंद यांनी निर्देशित केलेल्या ‘हम नौजवान’ (1985) या चित्रपटातून झाले. त्यावेळेस तब्बू यांचे वय अवघे 14 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी प्रमुख भूमिका म्हणून साकारलेला पहिला चित्रपट हा तेलुगू भाषेतील ‘कुली नंबर 1’ होता.

‘पहिला पहिला प्यार’ या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘विजयपथ’ या सिनेमातील भूमिकेसाठी तब्बू यांना फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला.पुढे तब्बू यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवरील पकड घट्ट रोवली.

1996 सली तब्बू यांचे तब्बल 8 सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातील साजन चले ससुराल, जीत हे सिनेमे तिकीट खिडकीवर तुफान गाजले.गुलजार यांनी निर्देशित केलेला या माचिस या चित्रपटासाठी तब्बू यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.पुढे तब्बू यांनी कौटुंबिक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली त्यातील त्यांचे हम साथ साथ है, विरासत, हुतुतू, अस्तित्व हे सिनेमे विशेष गाजले.

2001 चाली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी बार’ या चित्रपटाने तब्बू यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तसेच या चित्रपटातील भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत.त्यानंतर त्यांनी आपल्या चित्रपटातून विविध प्रयोग केलेत व त्यात त्या कमालीच्या यशस्वी झाल्यात. त्यातील त्यांचे चीनीकम, हेराफेरी, दृश्यम, अंधाधून, गोलमाल हे चित्रपट विशेष गाजले.

हिंदी चित्रपटाबरोबर तब्बू यांनी तमिळ, तेलुगू भाषेततील चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.तब्बू या 1980 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज यांच्या भगिनी आहेत.

आपल्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. आपल्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणानंतर तब्बू या प्रत्येक दशकात यशस्वी चित्रपट देण्यात कदाचित एकमेव अभिनेत्री आहेत.

Note: जर तुमच्याकडे Biography of Tabu in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Tabu information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button