रताळे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? | Sweet potato health benefits in marathi

मित्रांनो सुक्या, रेताड, भुसभुशीत जमिनीत उगवणारे रताळे हेही बटाटे, सुरण यांप्रमाणे कंदमूळ आहे. रताळ्याची वेल जमिनीवर आठ-दहा फूट लांबवर पसरलेली असते. रताळ्याचे (Sweet potato) अनेक प्रकार असले तरी त्यांमध्ये पांढरे व लाल दोन जाती आहेत. लाल रताळी ही पांढऱ्या रताळ्यांपेक्षा अधिक चवदार व गोड असतात.

रताळे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Sweet potato health benefits in marathi

  • रताळ्याची भाजी आहारामध्ये तर उपयोगी पडतेच परंतु उपवासातही त्याचा उपयोग होतो. विस्तवावर भाजलेली रताळी खावयास अत्यंत चविष्ट व रुचकर अशी लागतात.
  • रताळे थंड, बलदायक, जड व मलावरोध करणारे आहे. रताळ्यामध्ये कॅल्शिअम व फॉस्फरस पुरेशा प्रमाणात असते.
  • रताळी वायुकारक असल्यामुळे त्याची भाजी करताना आत वांग्याचे काप काढून टाकावेत.
  • रताळ्याचे पीठ दुधातून घ्यावे व त्यात साखर घालावी. लघवी साफ होण्यासाठी व आमांशाचा त्रास कमी होण्यासाठी याचा वापर होतो.
  • रताळी वाफवून किंवा निखाऱ्यांवर भाजून किंवा दुधात घालून खाल्ली जातात. रताळी सुकवून त्यांचे पीठ तयार केले जाते. उपवासाच्या पदार्थांसाठीही या पिठाचा उपयोग होतो. रताळ्याच्या पानांचाही भाजी म्हणून उपयोग केला जातो. रताळ्यांचा औषध म्हणून वापर केला जातोच परंतु औद्योगिक उत्पादन क्षेत्रामध्येही स्टार्च, अल्कोहोल, सिरप बनवण्यासाठी रताळी उपयोगात येतात.

हे सुध्दा वाचा:सुरण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • विंचवाने दंश केल्यास दंशस्थानी रताळ्याच्या वेलीचा पाला ठेचून बांधावा. रताळ्याचे वेल घरातील गुरांना खावयास घातले असता गुरे धष्टपुष्ट होतात.
  • अंगातील कडकी कमी होण्यासाठी तसेच शरीराला बल व पुष्टी प्राप्त करून देण्यासाठी रताळे भाजून सोलावे व दुधात कुसकरून साखर घालून खावे.
  • हगवणीचा त्रास असता रताळ्याचे काप तव्यावर शेकावे व त्यांचे बारीक पीठ करून पाण्याबरोबर घ्यावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button