वजन वाढण्यासाठी सप्लीमेंट्स घेताय? मग हे नक्की वाचा.

सध्याच्या काळात वजन वाढवण्यासाठी अनेक जण नवनवीन प्रयोग करत असतात. काही जण तर दररोज वर्कआउट करतात त्या सोबतच काही प्रोटीन शेक किंवा तत्सम पॉवरयुक्त पदार्थाचे सेवन करतात. विशेष म्हणजे सप्लीमेंट्स घेतल्यामुळे खरच वजन वाढतं का? असा दावा अनेक कंपन्या करतात. पण सप्लीमेंट्स घेतल्यामुळे कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

वजन वाढण्यासाठी सप्लीमेंटस घेताय? | Side effects of weight gainer supplements

श्वसनासंबधी तक्रारी

सप्लीमेंट्सचे सेवन केल्यामुळे अनेकांना श्वासनासंबंधित तक्रारी जाणवतात. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या असल्यास लगेच डॉक्‍टरांचा सल्ला नक्की घ्या.

पोटासंबंधित समस्या

वजन वाढविण्यासाठी सतत प्रोटीन पावडर किंवा तत्सम पावडरचं सेवन अनेक जण करतात. त्यामुळे अनेक जणांना पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यात पोट दुखी, पोटात मुरडा येणे. स्वच्छ न होणे अशा समस्या निर्माण होतात.

यकृताची समस्या

जी व्यक्ती मद्यपान करतात आणि त्याचसोबत वजन वाढवतात आणि पावडरचही सेवन करतात त्यांना लिव्हर विषयी समस्या जाणवू शकतात.

मुतखडा होण्याची समस्या

प्रमाणापेक्षा जास्त सप्लीमेंट्सचं सेवन केल्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते. या पावडरमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकतात.

अतिसार होणे

अनेक जणांना या सप्लीमेंट्स खाल्यानंतर ॲलर्जी होते. त्यामुळे पोट बिघडून अतिसार होणे यासारख्या समस्या होतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button