डॉक्टरची नोकरी करता करता झाले IAS अधिकारी | Success story of IAS Officer in marathi

ध्येय गाठण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा करणारे डॉक्टर आयएएस अधिकाऱ्याची Success Story आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Success म्हणजेच काय हे आज आपण या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात आणि मनात काही तरी करून दाखवण्याची जिद्द असली पाहिजे.हे सर्व करण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल.आज अश्याच एका डॉक्टरची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

IAS अधिकारी नागार्जुन गौडा यांची यशोगाथा| Success Story of Nagarjuna Gowda in Marathi

नागार्जुन गौडा ( Nagarjuna Gowda) यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती. तरीही त्यांनी न खचता कठोर परिश्रमाने अभ्यास केला. इंटरमीडिएट नंतर MBBS ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी MBBS मध्ये प्रवेश घेतला.MBBS झाल्या नंतर त्यांनी एका हॉस्पिटल मध्ये काम करण्यास सुरूवात केली. पण त्यांना मनात कुठं तरी वाटत होतं की, आपल्याला एक पोलिस अधिकारी व्हायच. मात्र त्यांनी अचानक UPSC करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांची घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. तरी त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचा घरात ते सोडून कोणीही कमावणारे नव्हते. अशा परिस्थिती नोकरी सुरु ठेऊन UPSC करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही प्रकारचा पर्याय नव्हता. नोकरीबरोबर तयारी करणं सोपं नव्हतं. हे आपल्याला माहीत आहे.

पण मनात करण्याची जिद्द असली की सगळं काही होत. हे नागार्जुन यांनी करून दाखवल. ते रोज सुमारे 6 ते 8 तास वेळ काढूण अभ्यास करायचे.चांगल्या प्रकारची प्लॅनिंग आणि रणनितीच्या भरवश्यावर त्यांनी नोकरीबरोबरच UPSC ची तयारी केली आणि परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली.

मित्रांनो आम्हाला या पोस्ट मधून एवढंच सांगायचं आहे की, जर तुम्हाला UPSC करायचं असेल तर तुम्ही नोकरी करूनही तयारी करू शकता आणि विशेष म्हणजे कोचिंगशिवाय यश मिळवता येते. फक्त त्यासाठी स्मार्ट काम, मेहनत आणि संयमानं तयारी करण्याची खूप गरज आहे.

Note:- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button