एकाच सिनेमात 9 भूमिका साकारणारे ‘संजीव कुमार’ यांचा जीवन प्रवास | Sanjeev Kumar Biography in Marathi

संजीव कुमार (sanjeev kumar) अर्थात हरीभाई जरीवाला यांचा जन्म 9 जुलै 1938 ला गुजरातमधील सुरत शहरात एका मध्यम वर्गीय गुजराती कुटुंबात झाला.संजीव कुमार यांना लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती, व तीच आवड त्यांना मायानगरी मुंबईत घेऊन आली. सुरुवातीच्या काळात त्यांनी नाटकांमध्ये काम केले व नंतर त्यांनी फिल्मालय नावाच्या ॲक्टींग स्कूल मध्ये आपले नाव नोंदवले.

संजीव कुमार यांचा जीवन प्रवास | Indian actor sanjeev kumar biography in marathi

1960 च्या दशकात ‘फिल्मालय’ बॅनर अंतर्गत ‘हम हिन्दुस्तानी’ या चित्रपटात त्यांना एक छोटीशी भूमिका करायला मिळाली व त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाने एका पेक्षा एक सिनेमे यशस्वी केले व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नायक बनले.1965 या वर्षी प्रदर्शित झालेला ‘निशाणी’ या सिनेमा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला सिनेमा होता. त्यानंतरही त्यांचा सिनेसृष्टीतील संघर्ष चालूच होता. त्यांना ज्या सिनेमात काम मिळेल ते स्वीकारत, तेव्हा त्यांनी स्मगलर, पती-पत्नी, हुस्न और इश्क, बादल, गुनहगार या सिनेमात काम केले पण या सिनेमांनी प्रेक्षक गृहात घोर निराशा केली.

पुढे 1970 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या सिनेमा म्हणजेच ‘खीलोना’ या सिनेमाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारात बसविले त्यानंतर त्यांच्या आलेला सिनेमा म्हणजे दस्तक या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. निर्माता, दिग्दर्शक व गीतकार गुलजार यांच्यासोबत त्यांनी 9 सिनेमांमध्ये काम केले. त्यामधील सिनेमा म्हणजे, आंधी (1975), मौसम (1975), अंगूर (1982), नमकीन हे सिनेमे विशेष गाजले.

हे वाचा- 8 फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावावर करणारे, किशोर कुमार यांचा जीवन प्रवास…

‘शोले’ चित्रपटातील ठाकुर या पात्राला त्यांनी अजरामर केले. पुढे त्यांनी आपल्या आपल्या चरित्र भूमिकांनी प्रेक्षकांना प्रभावित केले.1977 मधील अर्जुन पंडित या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 1976 मधील आंधी या सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ सहकलाकार अभिनेता या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. दस्तक व कोशिश या सिनेमांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

‘नया दिन नही रात’ या सिनेमात त्यांनी भूमिका केल्या व आपल्यातील अभिनयाची चुणूक फिल्म जगताला दाखविली.संजीव कुमार यांनी आपल्या सिनेमा कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. त्यामुळे ते आपल्या समकालीन अभिनेत्यापेक्षा उजवे होते.

गुजरातमधील सुरत शहरात एका शाळेला व रस्त्याला संजीव कुमार यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच 2013 मध्ये एक डाग टिकीट संजीव कुमार यांच्या स्मरणात सुरू करण्यात आले.6 नोव्हेंबर 1985 ला संजीवकुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यानंतरही या महान कलाकाराची 10 सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले.1993 ला प्रदर्शित झालेला ‘प्रोफेसर की पड़ोसन’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

Note: जर तुमच्याकडे Biography of sanjeev kumar in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला sanjeev kumar information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button