मुलाखतीचं टेन्शन आलंय? मग या टिप्स फॉलो करा

जॉब साठी मुलाखत म्हटलं की चांगले चांगले यांना घाम फुटतो मनात अनेक विचार चालू असतात. आपल्याला जॉब मिळतोय का? मुलाखतीत काय विचारतील? मला जमेल का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आज आम्ही सेक्सी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मुलाखत देण्यासाठी मदत मिळेल.

कोणत्या आहेत त्या टिप्स? | How to reduce tension in interview

  1. मुलाखत देऊन चांगला जॉब मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमचा लूक. याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखतीला जाताना दाढी वाढलेली असेल तर, दाढी काढून जाणे आणि मुलींनी केस मोकळे न सोडता नेहमी बांधून ठेवले पाहिजे. तसेच मेकअप न करता मुलाखत दिली पाहिजे.
  2. तुम्ही स्वतःला कसे सादर करता आणि तुमचा दृष्टिकोन तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे टेन्शन आलं असेल तर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हाला टेन्शन येणार नाही.
  3. मुलाखतीचं एक सूत्र तुम्ही ऐकलंच असेल, फर्स्ट इम्प्रेशन इज दि लास्ट इम्प्रेशन.तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला तुमचा जॉब गमवावा लागेल. त्यामुळे मुलाखत देताना किंवा देण्याच्या आधी टेन्शन आल असेल तर, लांब श्वास घेऊनच मुलाखतीला जा. यामुळे तुम्हाला भीती वाटणार नाही.
  4. मुलाखतीला जाताना कधीही कॅज्युअल आणि फॅकी कपडे घालून जाऊ नका. कारण तुमचा पोशाख तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. म्हणून फॉर्मल आणि सज्ञपणे कपडे निवडा यामुळे तूम्ही सभ्य दिसाल.
  5. मुलाखतीची भीती तर सर्वांनाच वाटत असते. पण मात्र काही लोक मुलाखतीला जाताना काहीच खाऊन जात नाही. यामुळे तुम्ही आजारी पण पडू शकता. तर मित्रांनो लक्षात ठेवा मुलाखतीला जाण्यापूर्वी काहीतरी खाऊन जा.

हे वाचा- यशस्वी जीवनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button