8 फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावावर करणारे, किशोर कुमार यांचा जीवन प्रवास…

आपल्या मधुर आवाजाने व उमदा अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्यप्रदेश मधील खंडवा येथील एका बंगाली परिवारामध्ये झाला. त्यांचे वडील कुंजीलाल गंगोपध्याय हे पेशाने वकील होते. व त्यांची आई गौरीदेवी ही गृहिणी होती.किशोर कुमार यांना दोन मोठे भाऊ म्हणजेच एक अनुप कुमार व दुसरे अशोक कुमार आणि एक बहीण सतीदेवी.

किशोर कुमार यांचा जीवन प्रवास | kishore kumar Biography in Marathi

किशोर कुमार यांना लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा फिल्म बघण्यात,अभिनय करण्यात व संगीत ऐकण्यात मन रमत असे. त्यांच्या शालेय जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण खांडवा येथील प्राथमिक शाळेतून पूर्ण केले. व आपले ग्रॅज्युएशन मध्यप्रदेश मधील इंदोर येथील ईसाई कॉलेजमधून पूर्ण केले.

किशोर कुमार यांच्या फिल्म सिंगिंग करियर विषयी बोलायचे झाल्यास त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत म्हणजेच अशोक कुमार यांच्या सोबत ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमात काम केले. व त्यानंतर आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी आपले नाव आभास कुमार न ठेवता किशोर कुमार ठेवले.

पुढे अभिनय करता करता त्यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. व आपल्या वयाच्या 18व्या वर्षी जिद्दी या सिनेमासाठी “मरने की दुआएं क्यों मांगू” या गीतासाठी पार्श्वगायन केले.त्या दिवसानंतर किशोर कुमार यांनी आपल्या अभिनयाने,आपल्या अचूक कॉमेडी टाइमिंग, मधुर पार्श्वगायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांनी अभिनय केलेले सिनेमे मुसाफिर, नौकरी, आंदोलन, पड़ोसन, हाफ टिकेट, नई दिल्ली, आशा, चलती का नाम गाड़ी हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.

पुढे अभिनयाबरोबरच त्यांनी आपला मोर्चा पार्श्वगायना कडे वळविला व त्यांनी पार्श्वगायन केले सिनेमे पुढील प्रमाणे, सागर, शराबी, अगर तुम ना होते, नमक हलाल, डॉन, आराधना इत्यादी आपल्या मधुर आवाजाने त्यांनी तरुणाईवर विशेष छाप सोडली.

किशोर कुमार यांना आपल्या मधुर आवाजासाठी 8 फिल्मफेअर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.13 ऑक्टोंबर 1987 वयाच्या 58 व्या वर्षी या अजरामर अभिनेत्याने या दुनियेला आदी अलविदा केला.

Note: जर तुमच्याकडे About kishore kumar in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला kishore kumar information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button