म्युच्युअल फंड म्हणजे काय ? | What Is Mutual Funds in Marathi

मित्रांनो आज आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत कि म्युचल फंड म्हणजे काय? “म्युच्युअल फंड ही संस्था,साधारणपणे समान असलेली पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक जणांचे पैसे एकत्र करून शेअर्स, रोखे, सोने (कमॉडिटीज) अशा मालमत्ता (ॲसेट) प्रकारात गुंतवते आणि त्यावरील परताव्याचे (रिटर्नचे) वाटप रक्कम गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये करते.

म्युच्युअल फंड काय आहे ? | What Is Mutual Funds in Marathi

संकल्पना म्युच्युअल फंडाची
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

“सेबी (सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) ही यांची नियंत्रक संस्था आहे आणि त्यांच्या नियमावलीनुसार, आर्थिक क्षमता उत्तम आहे व ज्यांची आजपर्यंतची कारकीर्दही चांगली आहे, अशा उद्योगसमूहांना किंवा वित्तसंस्थांना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी मि ळते. आपल्या देशात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय) या सरकारी वित्तसंस्थेचा म्युच्युअल फंड प्रथम स्थापन झाला. त्यानंतर सरकारी क्षेत्रातल्या बँकांना व नंतर खासगी क्षेत्राला परवानगी मिळाली. त्यानंतर परदेशी म्युच्युअल फंडांनीही स्वतंत्रपणे किंवा भारतीय कंपनीच्या सहकार्याने भारतात म्युच्युअल फंड स्थापन केले आहेत.आता असा आपल्याला प्रश्न पडतो की, म्युचल फंड मध्ये पैसे दिल्यानंतर त्यांची गुंतवणूक कशी होते?

हे वाचा- आर्थिक नियोजन करताना काय लक्षात ठेवायचे ?

“गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या रकमेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी फंड कंपनीकडे फंड व्यवस्थापक, संशोधक, विश्लेषक असे अनेक प्रकारचे लोक काम करत असतात. भारतातील आणि परदेशातील शाखांमधून ते आर्थिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करतात. म्युच्युअल फंडाकडे जमा झालेली रक्कम ज्या मालमत्ता प्रकारात गुंतवली जाते, त्या प्रकारावर बाजारात जसा परतावा मिळेल, त्यानुसार (म्युच्युअल फंड कंपनीचा खर्च वजा करून) परतावा दिला जातो. गुंतवणुकीवरचे नुकसान किंवा फायदा दोन्हीही युनिटधारकाचे असते. लोकांनी गुंतवलेल्या रकमेची म्हणजे मुद्दलाची किंवा त्यावरच्या परताव्याची हमी म्युच्युअल फंडाकडून मिळत नाही.आता आपल्या मनात परत एक प्रश्न निर्माण होतो की, अशी जर खातरी नसेल तर मी म्युच्युअल फंडात कशाकरता पैसे गुंतवायचे ?

“म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्हांला तुमची उद्दिष्टे अधिक चांगल येऊ शकतात. तुमच्या आर्थिक नियोजनाप्रमाणे तुम्हांला डेट, इक्विटी शेअर्स, सोने यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड परिणामकारक साधन आहे. सरकारी रोखे किंवा सरकारने हमी दिलेली गुंतवणूक वगळता तुम्हांला पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. त्यामुळे योग्य तेवढी जोखीम घेऊन जोखीम सापेक्ष परताव्याकडे लक्ष दिले पाहिजे. म्युच्युअल फंड याकरता तुम्हांला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि तुमच्या गुंतवणुकीचे एकात्मिक साधनही बनू शकतो. योग्य गुंतवणुकीची जबाबदारी ते घेतात त्यामुळे. तुमचे काम एकदम सोपे होते. मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला म्युचल फंड म्हणजे काय हे समजले असेल. आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत की, म्युचल फंड चे कोणकोणते फायदे आपल्या मिळतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button