‘पंकज त्रिपाठी’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pankaj Tripathi Biography in Marathi

हिंदी चित्रपट सृष्टीतील सध्याचे आघाडीचे सहकलाकार ‘पंकज त्रिपाठी’ ( Pankaj Tripathi) यांचा जन्म 5 सप्टेंबर 1976 ला बिहार मधील गोपालगंज जिल्ह्यातील, बेलसंड या गावात एका पंडित ब्राह्मण शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित बनारस त्रिपाठी व आईचे नाव हेमवंती देवी आहे.पंकज त्रिपाठी यांचे प्राथमिक शिक्षण हे गोपालगंज बिहार येथील D.P.H शाळेतून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आपले पुढील महाविद्यालयीन शिक्षण पटणा येथून पूर्ण केले.

पंकज त्रिपाठी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pankaj Tripathi Biography in Marathi

पंकज त्रिपाठी यांना बालपणापासूनच अभिनयाचे वेड होते व त्या वेडेपणामुळेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच दिल्ली येथील अभिनय अकॅडमीला अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ आवेदन दिले. पण पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. त्या नंतर दिलेल्या आवेदनानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मार्फत कला शाखेतून पदवी घेतली.बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या पंकज त्रिपाठी यांनी आपल्या शालेय जीवनात रंगमंचावर आपली छाप सोडली तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

पंकज त्रिपाठी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण हे 2004 साली प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन अभिनित रन या चित्रपटापासून झाले. त्यानंतर त्यांनी अनेक लहान-मोठ्या भूमिका केल्या त्यातील त्यांचे सिनेमे ओंकारा, अपहरण, धर्म, शौर्य, रावण.

पंकज त्रिपाठी यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खरी ओळख मिळाली तो सिनेमा म्हणजे गैंग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाने तिकीट खिडकीवर धुमाकूळ घातला. त्यातील सुलतान कुरेशी या पंकज त्रिपाठी यांच्या पात्राला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमानंतर पंकज त्रिपाठीचे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रस्थ वाढले त्यानंतर त्यांनी फुकरे, मांझी द माउंटेन मॅन, न्यूटन, गुंडे, निल बटे सन्नाटा, स्त्री या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली.

हिंदी चित्रपटाबरोबरच त्यांनी अनेक वेब सिरीज मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली त्यातील त्याच्या पावडर, मिर्झापूर, सेक्रेट गेम्स, क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज विशेष गाजल्यात.

आपल्या 17 वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 50 पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या व आणि वेब सिरीज मधील भूमिकांत आपली छाप सोडली. चित्रपटातील उल्लेखनीय कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.

हिंदी चित्रपटाबरोबर तमिळ चित्रपट तसेच वेब सिरीज मध्ये पंकज त्रिपाठी हे निर्माता व निर्दशकांचे आवश्यक चेहरा बनले.पंकज त्रिपाठी यांनी गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील सुलतान कुरेशी या पात्रासाठी तब्बल 8 तास ऑडिशन दिले आहे.

हे वाचा- इरफान खान यांचा जीवनप्रवास

Note: जर तुमच्याकडे Biography of Pankaj Tripathi in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Pankaj Tripathi information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button