एक हात नसताना जिंकलं सुवर्णपदक | Karoly takacs story in marathi

ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजीचे सुवर्णपदक मिळविणे याचा संबंध हाताशी नाही, तर आपल्या मनाशी जास्त जवळचा आहे, हे कारोलींनी निर्विवादपणे सिद्ध करून दाखविले. आयुष्याचेही असेच आहे. यशाचा संबंध कौशल्यापेक्षा दृष्टिकोनाशी जास्त जवळचा असतो. कारोलींनी हेही निर्विवादपणे सिद्ध करून दाखविले की, निष्ठा असेल तर कौशल्ये निर्माण करता येतात. उजवा नाही तर डावा हात आवश्यक ती कामे करू शकतो. कारोली यांच्यासारखी प्रखरनिष्ठा असेल तर ज्याने आपले दोन्ही हात गमावले आहेत असा माणूसदेखील आपल्या हातांऐवजी पायानेही नेमबाजी करू शकेल आणि सुवर्णपदक मिळवून दाखवेल. अशी असते जेत्याची मानसिकता आणि मनोभूमिका. चला तर जाणून घेऊया कारोली यांचा प्रेरणादायी प्रवासा बद्दल.

एक हात नसताना पण जिंकत सुवर्णपदक | Karoly takacs story in marathi

कारोली टॅकाचस (Karoly Takacs) हे हंगेरिअन सैन्यात सार्जंट या पदावर काम करीत होते. 1938 साली ते देशातील सर्वोत्तम पिस्तुलातून गोळी मारणारा खेळाडू (शूटर) म्हणून ओळखले जाऊ लागले. जवळ-जवळ सगळीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकने त्यांनी मिळविली होती.1940 साली टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील संभाव्य सुवर्णपदक विजेता म्हणून सारे जग त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत होते; परंतु एक अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडली. सैन्यातील एका प्रशिक्षण सत्रात कारोली यांच्या उजव्या हातात हॅन्ड ग्रेनेडचा स्फोट झाला आणि त्यात त्यांचा उजवा हात निकामी झाला. या दुर्दैवी अपघातामुळे त्यांचे केवळ ऑलिम्पिक विजयाचे स्वप्नच नव्हे, तर नेमबाजी करण्यात निष्णात असणारा उजवा हातच त्यांना गमवावा लागला. ते निराश झाले नाही कारण ते वेगळ्याच विचारांनी घडलेले होते.

आपण काय गमावले आहे (म्हणजे खात्रीपूर्वक सुवर्णपदक मिळवून देणारा उजवा हात) यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडे अजून शिल्लक असणाऱ्या उत्तमस्थितीतील डाव्या हातावर लक्ष केंद्रित करावयाचे त्यांनी ठरविले. त्यांचे मनोबल प्रचंड कणखर होते. त्यांची मनोभूमिका जेत्याची होती. विजयी होण्याची प्रचंड जिद्द आणि धगधगता अंगार त्यांच्या हृदयात अजूनही धुमसत होता. पूर्णपणे कार्यक्षम असा आपला डावा हात अजूनही आपल्याजवळ शिल्लक आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यांनी विचार केला की, उजवा हात निकामी झाला याचे दुःख करीत बसण्यापेक्षा आपण आपल्या डाव्या हाताला प्रशिक्षण देऊन जगातील सर्वोत्तम नेमबाज म्हणून तयार करू शकतो. याच विचाराने ते पछाडले गेले. जवळपास एक महिना त्यांनी रुग्णालयात घालवला.

आसपासच्या माणसांच्या प्रतिक्रियांचा अंदाज कारोलींना आला होता. त्यामुळे जगाच्या झगमगाटापासून दूर जाण्याचे त्यांनी ठरविले. परिचितांपासून स्वतःला वेगळे करून त्यांनी आपल्या डाव्या हाताने नेमबाजीचा सराव चालू केला. शरीराला होणाऱ्या सर्व यातना, डाव्या हातावर पडणारा ताण या सर्वांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करून उजवा हात जे जे करीत होता ते आपल्या डाव्या हाताकडून करून दाखवायचे याचा त्यांनी निश्चय केला होता. आपल्या या ध्येयावर त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड प्रयत्नांनी कारोलीने आपल्या डाव्या हाताला तयार केले.

एक हात असून पण सर्वोत्कृष्ट नेमबाज

एका वर्षानंतर कारोली हंगेरीतील नेमबाजीच्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत हजर झाले. त्यांना तेथे बघून स्पर्धेसाठी हजर असलेल्या सर्व खेळाडूंना अत्यानंद झाला. अपघातानंतर सर्वांना पहिल्यांदाच त्यांचे दर्शन होत होते. त्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल सर्वांनाच त्यांचे खूप कौतुक वाटत होते; कारण ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठीच येथे आले आहेत अशीच सर्वांची समजूत झाली होती. त्यामुळे सर्वांनाच धन्यता वाटत होती; परंतु जेव्हा कारोलींनी हे स्पष्ट केले की, मी येथे आपला प्रतिस्पर्धी म्हणून आलो आहे आणि या स्पर्धेतील राष्ट्रीय मानांकन मिळविण्याचा मी निश्चय केला आहे, हे ऐकल्यानंतर मात्र सर्व प्रतिस्पर्ध्याना आश्चर्याचा चांगलाच धक्का बसला.

कारोलींनी सर्व प्रतिस्पध्यापुढे चांगलेच आव्हान उभे केले आणि स्पर्धेत प्रथम मानांकन मिळवले. त्याचबरोबर आपला उजवा हात निकामी झाल्यावर केवळ एका वर्षातच आपल्या डाव्या हाताचा वापर करून स्पर्धेचे जेतेपददेखील त्यांनी मिळवून दाखवले. ते खरोखरच जेता ठरले होतो. इतरांच्या नजरेआड जाऊन एकांतात सराव करण्याचा कारोलींचा निर्णय किती अचूक आणि महत्त्वपूर्ण होता हे त्यांनी सिद्धच करून दाखविले होते. त्यांना समजले होते की, आपण बघितलेली खूप मोठी स्वप्नंसुद्धा समाजाला सहन होत नाहीत, आवडत नाहीत. अशी स्वप्नं त्यांच्या डोळ्यावर येतात आणि स्वप्नं बघणारा त्यांच्या टीकेचा शिकार बनतो.

मानांकन मिळूनही कारोलीचे ऑलिम्पिकमधील विजयाचे स्वप्न मात्र दुर्दैवाने काही वर्ष मृगजळच ठरले; कारण लागोपाठ दोन वेळेस, म्हणजेच सलग आठ वर्षे ऑलिम्पिक स्पर्धा जागतिक महायुद्धामुळे रद्द केल्या गेल्या होत्या. त्यानंतर1948 सालच्या लंडन येथील ऑलिम्पिकसाठी कारोलींची निवड झाली आणि त्यात आपल्या डाव्या हाताने नेमबाजी करीत त्यांनी सुवर्णपदक पटकावले.आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात.

आपण मोठ्या यशाच्या, गौरवाच्या, कीर्तीच्या, मोठेपणाच्या अगदी जवळ जातो आणि अचानक दुर्दैवाने हे सारं गमावून बसतो. सगळं जग जणू आपल्या विरुद्ध कटच करीत आहे अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. आपण उराशी बाळगलेली स्वप्नं पूर्णपणे बेचिराख होतात, भंग पावतात. आपण पराजित होतो आणि आक्रोश करतो की, हे असे माझ्या बाबतीतच का? असा प्रसंग यदाकदाचित आपल्यावर ओढवलाच तर कारोलीची आठवण करा, त्यांचे स्मरण करा. आपण काय गमावले आहे याची चिंता सोडा. आपल्या जवळ अजूनही काय शिल्लक आहे यावर सारे लक्ष केंद्रित करा. मित्रांनो करोली टॅकाचस यांनी जीवनात कधीच हार मानली नाही. त्यामूळे त्यांना जे साध्य करायचं होत ते त्यांनी केलं. मित्रांनो तुम्हाला करोली टॅकाचस यांचा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Note: जर तुमच्याकडे Biography of Karoly takacs in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Karoly takacs information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button