शेवग्याच्या शेंगा खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Moringa health benefits in marathi

मित्रांनो शेवग्याचे बी त्रिकोणी व पांढरट असते. ते ‘पांढरे मिरे’ म्हणूनही ओळखले जाते. शेंगांची, शेवग्याच्या पाल्याची तसेच फुलांची भाजी केली जाते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये शेवग्याच्या शेंगांचे सूप ‘ड्रमस्टीक सूप’ म्हणून मिळते. तसेच या शेंगा घातलेले पिठलेही रुचकर लागते. शेंगा घालून कढीही बनवली जाते. शेवग्याच्या जातीमधील गोड शेवगा औषधासाठी तर कडू शेवगा वातविकार व बाह्यविकारांवर उपयोगी पडतो. शेवग्याच्या झाडावर येणारा डिंक कपडे छापण्यासाठी तयार होणाऱ्या रंगात वापरला जातो. शेवग्याच्या बियांमधून निघणारे तेल, सुगंधी तेल बनवण्यासाठी तसेच घड्याळे साफ करण्यासाठी वापरतात.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Moringa health benefits in marathi

  • शेवगा (Moringa) गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त व रक्तप्रकोपक असून शेवग्याची भाजी वातविकारहारक आहे.
  • शेवग्याच्या मुळ्यांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.
  • या काढ्यात मध घालून दिवसातून दोन-तीनदा थोडे थोडे घेतल्यास पोटातील बारीक कृमी नष्ट होतात.
  • या काढ्यात सोडा घालून प्यायल्याने मूतखडा विरघळून निघून जातो.
  • शेवग्याच्या मुळाची साल पाण्यात किंवा गोमूत्रात उगाळून नायट्यावर लेप दिल्यास नायटा बरा होतो.
  • चित्रकमळ, शेवग्याच्या मुळाची हिरवी साल व कोंबड्याची विष्ठा वाटून त्याचा लेप नारूवर दिला असता नारू बरा होतो.
  • दाताच्या पोकळीत शेवग्याचा डिंक भरल्याने दातदुखी बरी होते.
  • शेवग्याच्या मुळांच्या रसात तेल, सैंधव व मध घालून त्याचे थेंब कानात टाकल्याने कान दुखावयाचे थांबते. शेवग्याचा डिंक तेलात घालून त्याचे थेंब कानात टाकल्यानेही कान दुखावयाचे थांबते.
  • शेवग्याच्या सालीच्या काढ्यामध्ये चित्रकमूळ, पिंपळी यांचे चूर्ण घालून व त्यात सैंधव टाकून पाजल्याने जलोदर नाहीसा होतो.

हे सुध्दा वाचा:गवार खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • शेवग्याच्या सालीचा काढा प्यायल्याने व त्याच्या सालीचे पोटीस बांधल्याने साकळलेले रक्त मोकळे होऊन प्रवाही बनते. गळवे बरी होतात. शेवग्याची साल गळवांवर चोळल्याने गळवे चिरून जातात.
  • शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो.
  • शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळल्यास डोक्यातील कोंडा निघून जातो.
  • मस्तकशूळ झाल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप करावा.
  • पोट फुगले असता शेवग्याच्या पानांच्या रसात काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून प्यावा.
  • शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, सैंधव व पिंपळीचे चूर्ण घालून प्यायल्याने प्लीहोदर बरा होतो..
  • शेवग्याच्या काढ्यात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वायूचा प्रकोप होऊन शरीरात कोठेही दुखत असल्यास थांबते.
  • शेवग्यांच्या पानांचा काढा भरपूर प्रमाणात करून एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून त्यात मूळव्याधग्रस्त रुग्णाला बसवल्यास त्याच्या वेदना दूर होतात.
  • शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यात घातल्याने डोळे दुखावयाचे बंद होते.
  • शेवग्याचा डिंक दुधात वाटावा. मस्तक पिडा होत असल्यास शेवग्याच्या डिंकाचा मस्तकावर लेप द्यावा.
  • मिरपूड व शेवग्याचे बी बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button