गवार खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cluster beans health benefits in marathi

मित्रांनो गवारीच्या शेंगांचा उपयोग आपण भाजीकरता करतो. निचरा होणाऱ्या चांगल्या, कोरडवाहू जमिनीत गवार रुजून येते. गवारीचे रोप दोन-तीन हात लांब वाढते. गवारीचे सर्वसाधारणपणे देशी व विलायती असे दोन प्रकार पडतात. कोवळी व मऊ गवार स्वयंपाकात वापरली जाते. गवारीच्या शेंगांचा खतासाठी व गुरांच्या खाण्यासाठीही वापर केला जातो. कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग होतो.

गवार खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cluster beans health benefits in marathi

  • गवार ही मूलतः मधुर, थंड, पित्तहारक, पौष्टिक, सारक, रुक्ष, जड, कफ व वायुकारक आहे.
  • शरीराला कंड सुटत असल्यास गवारीच्या पानांचा व लसुणाचा एकत्रित रस काढून शरीरावर चोळावा.
  • गवारीच्या पानांचा रस जखमेच्या व्रणावर लावल्यास जखम न पिकता लवकर भरून येते.
  • गवारीच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्याने रातांधळेपणा दूर होतो.

हे सुध्दा वाचा:मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी एक वरदान आहे, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

  • दुभत्या गुरांना गवार खाऊ घातल्यास गुरे भरपूर दूध देतात तसेच बैलांना शक्ती प्राप्त करून देण्यासाठीही त्यांना गवारीचा खुराक देतात. गवारीचा उपयोग डिंक बनवण्यासाठीही होतो.
  • गरोदर स्त्रिया व वातूळ प्रकृतीच्या माणसांनी गवारीची भाजी खाणे टाळावे. जून झालेल्या गवारीची भाजी खाल्ल्यास पोटात कळ येऊन चक्कर आल्यासारखे वाटते. क्वचित चक्करही येते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button