मूग डाळचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Moong dal health benefits in marathi

मित्रांनो सर्व कडधान्यांमध्ये मूग (Mung bean) हे द्विदल धान्य सर्वश्रेष्ठ समजले जाते. मूग हे धान्य काळ्या, हिरव्या, पांढऱ्या, लाल, पिवळ्या रंगामध्ये मिळते. आमटी, खिचडी, लाडू यातून मूग आपल्या आहारामध्ये येतात. मुगाचे पाणी वात, कफ व पित्त हे विकार दूर करते. आजारी माणसांसाठी तर मूग पौष्टिक समजले जाते.

मूग डाळचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Moong dal health benefits in marathi

  • मूग रुक्ष, कफ-पित्तनाशक, हलके, थंड, मधुर, नेत्रहितकारक, जुलाबात गुणकारी असतात.
  • 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये अर्धा लीटर पाणी घालावे. हे मिश्रण 1/4 होईपर्यंत उकळवावे, गाळावे व त्यामध्ये अर्धा चमचा मध घालून घ्यावा. पित्तज्वरामध्ये फायदा होतो.
  • आमटी, खिचडी, पापड, सांडगे, भाजी यांमधून आपल्या आहारामध्ये मुगाचे सेवन अवश्य करावे. थंडीमध्ये मुगाचे लाडू खाणे फायदेशीर ठरते.
  • 100 ग्रॅम मुगाचा 1 लीटर पाण्यात अर्धा भाग काढा करावा व एकवीस दिवस हे पाणी घेतल्याने मूतखड्यावर प्रभावी नियंत्रण राहते.

हे सुध्दा वाचा: उडीद डाळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • हिरवे मूग भाजून त्याचा पाव भाग काढा करून त्यात कुरमुरे, साखर व मध घालावा. हे मिश्रण उलटी, हगवण, दाहज्वर यांमध्ये फायदेशीर ठरते.
  • मूग (Moong dal) वायूवर्धक असल्याने शिजवताना आले, लसूण, हिंग व मिरपूड यांचा वापर करावा.
  • साल असलेले अख्खे मूग मातीच्या भांड्यात पाण्यात घालून शिजवावेत. नंतर हे पाणी आजारी माणसाला द्यावे. या पाण्याला चव येण्यासाठी जिरे- तुपाची फोडणीही दिली जाते. आजारी माणसांसाठी हे उत्तम टॉनिक आहे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button