उडीद डाळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Vigna mungo health benefits in marathi

मित्रांनो उडीद (Vigna mungo) हे अत्यंत पौष्टिक असे कडधान्य आहे. उडदाचे दाणे काळपट रंगाचे परंतु आतील डाळ मात्र पांढरीशुभ्र असते. उडदाचा वापर आमटीमध्ये, वडे, सांडगे, पापड, उडीदपाक आदींमध्ये केला जातो.

उडीद डाळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Vigna mungo health benefits in marathi

  • उडीद जड, मधुर, वायुनाशक, रुचकर, स्निग्ध असतात.
  • नाकाच्या विकारामध्ये उडदाचे पीठ, लाल रेशमी कापडाची राख, कापूर पाण्यात कालवून त्याचा लेप कपाळावर द्यावा.
  • उडीद पचावयास अत्यंत जड असल्याने त्यात लसूण व हिंगाचा वापर करावा. अग्निमांद्याचा त्रास असणाऱ्यांनी शक्यतो उडदाचे सेवन टाळावे. पोट फुगणे, अपचन यासारखा त्रास होतो. पित्त व कफ यांचा त्रास असणाऱ्यांसाठीही उडदाचे सेवन फारसे हितावह नाही.
  • उडदाच्या डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ व पिंपरीचूर्ण प्रत्येकी पन्नास ग्रॅम घ्यावेत. त्यात 100 ग्रॅम तूप घालून विस्तवावर चांगले परतून घ्यावेत. त्यात समभाग साखर व साखरेच्या दुप्पट पाणी घालून त्याचा पाक तयार करावा. या पाकाचे छोटे छोटे लाडू तयार करून रोज रात्री झोपताना दुधातून खावे. शरीराचे बल वाढते. शरीराला पुष्टी येते. अशक्तता, कमजोरी यांवर त्याचा फायदा होतो.

हे सुध्दा वाचा: लिंबू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • उडदाची डाळ (Vigna mungo) वाटून त्यात हिंग, जिरे, लसूण, मीठ, मिरी, आले वाटून घालावेत. या मिश्रणाचे छोटे वडे करून तळावेत व खावेत. वायू जाणे, अशक्तता, क्षय, शूळ, अरुची यांमध्ये त्याचा फायदा होतो. हे वडे दह्यामधून (गोड दही) खाल्ल्यानेही शरीरास बल प्राप्त होते.
  • ताजे उडीद वाटून त्याचा लेप पांढऱ्या कोडावर लावला असता फायदा होतो.
  • उडिदाच्या डाळीचे पीठ गाईच्या दुधात वाफवून त्यात तूप घालून गरम गरम खावे. हा प्रयोग सात-आठ दिवस केल्याने लघवीवाटे धातू जाणे बंद होते.
  • तोंडाला चव नसेल तेव्हा उडदाचा पापड भाजून किंवा तळून खावा.
  • खांदा दुखावल्यास उडदाचे तेल व लसूण गरम करून त्याने मसाज करावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button