लिंबू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |lemon health benefits in marathi

मित्रांनो लिंबू (lemon) स्वादाने आंबट असते. कागदी लिंबू अधिक गुणकारी असते. लिंबाचे अर्क काढले जातात. त्याचे सरबत तसेच लोणचेही केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने लिंबाचा फार मोठा उपयोग होतो.

लिंबू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | lemon health benefits in marathi

 • लिंबू कापून त्यावर सैंधव घालून चोखल्याने अजीर्ण नाहीसे होते.
 • पिकलेल्या लिंबाचा रस काढावा. त्यात साखरेचा पाक घालून सरबत करून बाटलीमध्ये भरून ठेवावे हे सरबत पाण्यात घालून प्यायल्याने उष्णतेचे विकार, अपचन, बेचैनी, उमासे येणे, मंदाग्नी, उलटी, रक्तविकार, पित्तप्रकोप यांवर फायदा होतो.
 • लिंबाचा रस (lemon juice) आंबट असला तरी त्यामुळे रक्तातील आंबटपणा दूर होतो.
 • लिंबाचा रस रोगजंतुनाशक असल्याने त्याचे नित्य सेवन करणाऱ्याला संसर्गजन्य रोगाचा त्रास होत नाही.
 • उष्णतेमुळे होणाऱ्या विकारात लिंबाचा फायदा होतो. तहान लागणे, कंठशोष यामध्ये लिंबाच्या रसाचा फायदा होतो.
 • पावसाळ्यात अरुची, ताप, उलटी, अजीर्ण, हगवण यासारख्या रोगांमध्ये लिंबाचा फायदा होतो.
 • पित्तविकाराचा त्रास झाल्यास लिंबापासून घेतलेला मुरांबा खाणे फायदेशीर ठरते.
 • तोंडाला चव नसणे व अपचन आदी त्रास झाला असता लिंबाच्या रसात साखर, लवंगांचे चूर्ण, मिरेपूड घालून सरबत प्यावे.
 • अपचनामुळे उलटी, आंबट ढेकर, पोट फुगणे आदी विकार झाल्यास लिंबाच्या फोडीवर सुंठपूड व सैंधव घालून विस्तवावर ठेवून त्या चांगल्या खदखदल्या की त्याचा रस चोखून खावा.
 • जठरात दूषित अन्नविकाराने झालेली उलटी बंद होण्यासाठी लिंबाच्या फोडी साखर घालून चोखाव्यात.
 • रक्तपित्ताचा त्रास होत असता लिंबाचे सरबत घ्यावे.
 • लिंबाचा रस व पाण्याच्या गुळण्या केल्या असता दाताच्या हिरड्या ठिसूळ होऊन रक्त निघण्याचे प्रमाण कमी होते.
 • पोटात दुखत असेल तर लिंब व आल्याचा रस थोडी साखर घालून प्यावा.
 • लिंबू व कांद्याचा रस थंड पाण्यातून घेतल्यास अपचनामुळे होणारा अतिसार बरा होतो.
 • लिंबाचा रस गरम पाण्यातून रोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने सर्दी बरी होते.
 • अर्धा चमचा लिंबाच्या रसात मध घालून चाटल्यास तीव्र खोकला व दम्याचा जोर कमी होतो.
 • लिंबाचा रस थंड पाण्यातून सकाळी घेतल्यास मलावरोध दूर होतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी लिंबू, साखर, पाणी घेतल्यासही बद्धकोष्ठ मलशुद्धी होते.

हे सुध्दा वाचा:चिंचाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • लिंबाच्या रसात थोडे सैंधव घालून रोज प्यायल्याने मूतखडा विरघळतो.
 • सुक्या लिंबाची राख करून ती मधामधून घेतल्यास उचकी बंद होते.
 • हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस बोटावर घेऊन हिरड्यांवर चोळावा.
 • लिंबाच्या रसात सोडा मिसळून कानात घातल्याने कानातून पू वाहणे बंद होते.
 • नायटा बरा होण्यासाठी लिंबाच्या रसात चिंचोका घासून त्याचा लेप करावा.
 • त्वचेवरील विकार उदा. शुष्कता, कंड घालवण्यासाठी लिंबाचा रस खोबरेल तेलामध्ये घालून चोळावा.
 • लिंबाचा रस केसांच्या मुळाशी लावून मगच डोके चांगले घासून धुवावे. केसातील मळ नाहीसा होतो. केस मऊ व चमकदार होतात.
 • डोक्यात खवडे झाले असल्यास लिंबाचा रस व तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन डोक्याला चोळावे व डोके दह्याने चांगले घासून धुवावे.
 • स्नान करताना पाण्यामध्ये लिंबू पिळावे. त्वचा मुलायम व चमकदार बनते.
 • ज्यांचे यकृत दुर्बल आहे अशांनी लिंबाचा वापर टाळावा.
 • लिंबाचा रस रात्री झोपताना चेहऱ्यास लावावा. मुरुमे बरी होतात.
 • लिंबाच्या अतिरेकी सेवनामुळे रक्तातील आम्लता फार वाढते. लिंबू नियमितपणे चोखून खाल्ल्यास दातावरील पांढरे आवरण मऊ पडते व दात ठिसूळ होतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button