ताप उतरविणारे आणि हृदयाला शक्ती देणारे बेलफळ !

रक्त खराब असल्यास अनेक प्रकारचे त्वचाविकार उद्भवतात. अनेक उपचार करूनही त्वचाविकार चिवट बनतात. कारण रक्त शुद्ध नसते. रक्तशुद्धीकरणासाठी बेलाचा गर उत्तम आहे, बेलफळाच्या गराचे चूर्ण दिवसातून तीन वेळा अर्धा ते पाऊण चमचे घ्या. रक्तशुद्धी सुरू होईल. रक्त खराब असल्यामुळे उद्भवणारे विकार आश्चर्यकारकरित्या मिटतील.

ताप उतरविणारे आणि हृदयाला शक्ती देणारे बेलफळ | Indian Bael Benefits in Marathi

बेलाच्या पानांचा जसा औषधी उपयोग आहे तसाच उपयोग बेलफळाचा आहे.अतिसारावर तर बेलफळ रामबाण आहे. बेलाचा गर जितका औषधी तितकेच अर्धवट कच्चे बेलफळ औषधी. जसे बेलफळाचा मुरंबा औषधी तसे बेलफळाचे सरबतही औषधी बेलफळाला उगीच नाही फळांचा ‘महाराजा’ म्हणत.

बेलाचा मुरंबा तयार करा !

बेलफळ नेहमीच उपलब्ध होईल असे नाही. तसेच बेलफळाच्या गराचे चूर्णही आयुर्वेदिक दुकानात बाराही महिने मिळेलच असे नाही. अशासाठी बेलफळे आणून त्यांचा मुरंबा तयार करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. आमांश व अतिसारावर हा मुरंबा वैद्य मंडळी सर्रास वापरू लागली आहेत. हा मुरंबा तयार करण्याची रीत पुढीलप्रमाणे आहे.

अर्धवट पिकलेल्या बेलफळाचा गर काढा. तो मोदकपात्रात घेऊन त्याला वाफ द्या. वाफ दिल्याने गर मऊ होईल. त्यानंतर या गराच्या चौपट साखर घ्या आणि ती शिजवा. चांगला तीन तारी पाक झाला की त्यात हा वाफवलेला बेलाचा गर टाका. वर जायफळ, केशर व जायपत्री सोडा. चांगले दोन महिने मुरू द्या. असा मुरलेला मुरंबा आमांश, अतिसार, फार शौचास होणे यावर गुणकारी आहे.

बेलफळाचे सरबत

बेलफळाचे सरबत उष्णता कमी करणारे आहे. ते सौम्य रेचकही आहे. बेलफळाचा गर पन्नास ग्रॅम घेऊन तो अडीचशे मि. लि. पाण्यात वाटा. त्यानंतर गाळून घ्या. गाळलेल्या द्रवात पन्नास ग्रॅम साखर टाका आणि एका बाटलीत भरून ठेवा. झाले बेलफळाचे सरबत उष्णतानाशक आणि जिवाला थंडावा देणारे आयुर्वेदिक सरबत

हृदयविकारावर बेलाचा गर

हृदयविकारावर बेलफळाचा रस गुणकारी आहे. पिकलेल्या बेलफळाचा गर घ्या. त्यात दुधाची मलई मिसळा आणि रोज सकाळी खा ! असे केल्याने हृदयाची गती उत्तम चालते व हृदयालाही बळ येते.

भूक लागण्यासाठी बेलफळ

ज्यांची भूक मेली आहे अशांनी पिकलेल्या बेलफळाचा गर घ्यावा व त्यात दोन चमचे मध मिसळून एकजीव करून खावा. भरपूर भूक लागेल. पिकलेल्या बेलफळाचा गर काढा. तो चांगला पिसून घ्या. त्यात साखर मिसळा व ते मिश्रण मातीच्या भांड्यात ठेवा. त्या भांड्यात प्रमाणात पाणी ओता. हे पन्हे प्याल्यास शरीरातील गरमी निघून जाते. भूकही आपोआप लागते.

ताप आणि बेलफळ

तापावर बेलफळाच्या गराचे चूर्ण त्वरित गुणकारी आहे. ते बाजारात विकत मिळते. ते घरात आणून ठेवावे. तापात एक ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत घ्यावे. ताप उतरेपर्यंत देत रहावे. ताप हमखास उतरतो. बाहेरची औषधे व इंजेक्शने घेण्याची जरूरी भासत नाही.

बेलफळातील बिया उत्तम विरेचक

बेलाचे बी हे विरेचक आहे. या बियांमध्ये हिरव्या व पिवळ्या रंगाचे तेल असते. बेलफळांच्या बियांचे चूर्ण अर्धा ते एक चमचा पाण्यासोबत रात्री घेतल्यास सकाळी शौचास साफ होते.

अशक्तपणावर मात करा !

बेलफळाच्या आतल्या गराचे चूर्ण पाच ग्रॅम त्याची फक्की तोंडात टाका आणि वर दूध प्या. असे महिनाभर करा. शरीराला ताकद येईल आणि मनालाही उभारी येईल.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button