डॉ. बेंजामिन कार्सन यांचा प्रेरणादायी प्रवास… | Dr.Benjamin Carson Biography in Marathi

प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही देशाचा, वंशाचा किंवा कोणत्याही परिस्थितीतील असो सर्वांना एकच मेंदू असतो. आपल्याला हवे ते साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते.. इतरांकडून आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन मिळते; परंतु प्रत्येकाला स्वतःचे ध्येय स्वतःच निश्चित करावे लागते. डॉक्टर बेंजामिन कार्सन यांच्या जीवनातून अडचणींवर मात करून यशाचं शिखर गाठण्याची सामर्थ्यशाली शिकवण आपल्याला मिळते. त्यांच्याप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यात काही आमूलाग्र बदल घडवून आणू शकूत का? प्रयत्न तर करून बघू या…

डॉ. बेंजामिन कार्सन यांचा प्रेरणादायी प्रवास… |Dr.Benjamin Carson Biography in Marathi

डॉ. बेंजामिनचा जन्म अमेरिकेतील डेट्रॉइट येथे 18 सप्टेंबर, 151 रोजी झाला. तो आठ वर्षांचा असतानाच त्याचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले. त्यामुळे त्याची आई सोन्या यांच्यावर बेंजामिन आणि त्याचा लहान भाऊ कर्टिस यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आली. सोन्या यांना त्यासाठी मोलमजुरीची कामे करणे भाग पडले.

डॉ. बेंजामिन कार्सन शिक्षणाबद्दल माहिती |Dr.Ben carson education information in marathi

शाळेत बेंजामिन हे सर्वांत मठ्ठ मुलगा म्हणून ओळखले जात असे. वर्गातील मुले त्यांना चिडवत असत. त्यामुळे बेंजामिन यांचा स्वभाव भयंकर रागीट झाला होता. शाळेतून बेंजामिन यांचा बद्दल अनेक तक्रारी येत असत. त्या ऐकून त्याच्या आईने त्याच्यावर अनेक बंधने घालून त्याला चांगले वळण लावण्याचा विडाच उचलला होता. त्याचे टी.व्ही. पाहणे बंद केले आणि त्याला हाताला पकडून वाचनालयात नेले.

आठवड्याला दोन पुस्तके वाचून त्याचा लेखी अहवाल त्याने आईला दिलाच पाहिजे असा आईचा दंडक असे. या सर्वांचा खूपच सकारात्मक परिणाम बेंजामिन यांचा स्वभावात झाला. बेंजामिन यांना वाचनाची आवड निर्माण झाली. ते आदळआपट न करता शाळेत जाऊ लागले. एकदा तर शिक्षकांनी दाखवलेल्या एका दुर्मीळ खडकाची ओळख वर्गातील मुलांना करून देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्याचवेळी आपण मठ्ठ नाही हे बेंजामिन यांच्या लक्षात आले. आपल्या ज्ञानाच्या प्रभावामुळे पुढे सतत वर्गात छोटा बेंजामिन कौतुकाचा विषय होत गेला आणि परीक्षेतही सर्वप्रथम येऊ लागला. ज्ञानाच्या भुकेने त्यांना पछाडले होते. त्याने यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचली. त्यामुळे आपणही काहीतरी वेगळे करून दाखवावे ही तृष्णा त्याच्या मनात जागृत झाली.

अनेक पुस्तके वाचून ज्ञान संपादनाचा त्याचा उद्योग अविरत चालूच राहिला. आपण डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटू लागले. आपले भवितव्य उज्ज्वल घडण्यात महत्त्वाचा उडथळा असणाऱ्या त्याच्या रागीट स्वभावावर बेंजामिन यांनी नियंत्रण मिळविले. अथक परिश्रमांनी त्यांनी ‘येल’ विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी मिळविली आणि ते डॉक्टर झाले. त्यांनी मिळविलेल्या यशात त्यांच्या आईचा मोठा वाटा आणि धडपड होती. बेंजामिन डॉक्टर होईपर्यंत त्यांना आपल्या आईला लिहिता-वाचता येत नाही हे माहीतच नव्हते.

डॉ. बेंजामिन कार्सन यशस्वी सर्जन

पुढे त्यांनी मिशिगन विद्यापीठात प्रवेश घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपले हात आणि डोळे यांच्यात अतिशय उत्तम समन्वय आहे आणि थ्रिडायमेंशनल (त्रिमित) गोष्टी हाताळण्याचे उत्तम कौशल्य आपल्याकडे आहे. त्यानंतर त्यांनी सर्जन व्हायचे ठरविले. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर बाल्टिमोर येथील ‘जॉन हाफ्कीन हॉस्पिटल’ मध्ये त्यांनी काम सुरू केले. तेथेच वयाच्या अगदी 33 व्या वर्षीच सर्वांत तरुण संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

1987 साली डॉ. बेंजामिन कार्सन यांनी एक इतिहास घडविला. 50 सभासद असलेल्या वैद्यकीय तुकडीचे नेतृत्व करून तब्बल 22 तास एक ऑपरेशन केले. त्यात एक मेंदू असणाऱ्या जुळ्या मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी दोघांनाही जीवनदान मिळवून दिले. हा वैद्यकीय क्षेत्रातील एक चमत्कार होता; कारण आतापर्यंत झालेल्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत दोघांचेही प्राण त्यापूर्वीकधीच वाचले नव्हते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत बहुया दोघांचाही किंवा एकाचा तरी मृत्यू होत असे. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीयशास्त्राला आव्हान देणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

हे सुध्दा वाचा:- होमिओपॅथी औषधाचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

‘येल’ विद्यापीठातील त्यांची एक मैत्रीण ‘लॅकेना रुस्तीन’ (कॅडी) यांच्याबरोबर बेंजामिन यांचा विवाह झाला. त्या उत्तम संगीतकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यामुळे डॉक्टरांनाही संगीताची आवड निर्माण झाली. डॉक्टरांना त्यांच्या देदीप्यमान कामगिरीमुळे अनेक मानसन्मान मिळाले. जवळजवळ 61 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्यांना 2008 साली प्रेसिडेंटल मेडल ऑफ फ्रीडम’ या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने जॉर्ज बुश यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘गिफ्टेड हँडस्’ या त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांचे वैज्ञानिक तत्त्वज्ञान, कठोर परिश्रम आणि परमेश्वरावरील श्रद्धा यांच्या जोरावर यश मिळते असे सांगणारी ‘बिग पिक्चर’, ‘टेक द रिस्क आणि ‘थिंक बिग’ ही पुस्तकेही खूप लोकप्रिय झाली आणि त्यांनी विक्रीचा उच्चांक गाठला. त्यांची जीवनगाथा सांगणारे काही चित्रपटही प्रदर्शित झाले होते.

आईचा सिंहाचा वाटा

डॉक्टर बेंजामिन कार्सन यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यांची आई ‘सोन्या’ ही अशिक्षित होती. आयुष्यात कोणतेही मोठ यश वा पद तिच्याकडे नव्हते, तरी तिने आपल्या मुलाकडून सकारात्मक अपेक्षा बाळगली. आपल्या मुलाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. शालेय अभ्यासात आधी अतिसाधारण असणारा त्यांचा मुलगा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी बहुमानप्राप्त नागरिक बनला, यामध्ये त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आपण स्वतः खूप उच्चशिक्षित असायला पाहिजे असे नाही, तर आपल्या सकारात्मक अपेक्षा आणि स्वप्नं त्यांना यशासाठी लागणारी ऊर्जा मिळवून देऊ शकतात.

Note: जर तुमच्याकडे About Dr.Benjamin Carson मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Dr.Benjamin Carson in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button