या सवयी आरोग्यासाठी आहेत धोकादायक | How Your Bad Habits Affect Your Health

आपल्यातील प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात. यामध्ये काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट असतात.आणि विषेश म्हणजे खाण्याच्या बाबतीतही काही सवयी असतात. अनेकदा या सवयी चुकीच्या असू शकतात. आपल्याला जरी माहिती असलं की या सवयी चुकीच्या आहेत तरीही आपण त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही.मात्र असं करणं आपल्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. त्या कोण कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, थोडक्यात जाणून घेऊयात.

या सवयी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे ? | How Your Bad Habits Affect Your Health

  1. थोड खाणं किंवा न खाणं हा वजन कमी करण्याचा उपाय नाही. त्यापेक्षा बराच काळ भूक लागल्याने तुमचं वजन सुद्धा झपाट्याने वाढू शकत. त्याचप्रमाणे शरीर कमकुवतही होतं. म्हणून, बराच वेळ उपाशी राहण्याची सवय आपण सोडली पाहिजे.
  2. जास्त खाणं टाळण्यासाठी एकाच वेळी भरपूर अन्न खा. दिवसभरातून एकदा फळं, हिरव्या भाज्या, रस, निरोगी स्नॅक्स खा.
  3. प्रत्येकाला झोपायला आवडतं. पण निरोगी शरीरासाठी आठ तास झोप खूप महत्त्वाची आहे. मात्र तुम्हाला दररोज बर्‍याच वेळ अंथरुणावर पडून राहिलो किंवा उशीरा उठलो तर ते देखील आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. हे केवळ लठ्ठपणा वाढवणार नाही तर बर्‍याच आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे.
  4. अनेकांना उठल्याबरोबर चहा पिण्याची खूप जणांना सवय असते. परंतु बेड टीची सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
  5. सकाळी चहा प्यायल्याने गॅस आणि ॲसिडिटीची समस्या वाढते. त्याचप्रमाणे रिकामी पोटात साखरेमुळे स्थूलपणा देखील वाढतो. त्याऐवजी कोमट पाण्याने दिवसाची सुरूवात करा. दररोज सकाळी एक ते चार ग्लास पाणी रिकाम्या पोटी प्या.
  6. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पायी चालणे खूप महत्त्वाचं आहे. चालल्यामुळे जेवण व्यवस्थित पणे पचत. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर, काही काळ चालले पाहिजे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button