अभिनेत्री इंग्रिड बर्गमेन यांच्या जीवनाबद्दल माहिती | Ingrid Bergman Biography in Marathi

इंग्रिड बर्गमेनचा जन्म 29 ऑगस्ट 1915 ला स्टॉकहोम स्वीडन येथे झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्या अभिनय करण्याचा निर्णय घेऊन बसल्या होत्या. सन 1932 मध्ये त्यांनी एक स्वीडिश फिल्म ‘लँडस्केप’ मधून हळूच प्रवेश केला.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्या चुलत्यासोबत राहू लागल्या. त्यांनी काही काळासाठी नाटकात काम करण्याचे ठरविले परंतु त्यांना लवकरच समजले की नाटकातला अभिनय त्यांच्यासाठी नव्हता.

त्यांनी अनेक चित्रपटात काम करून सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा दर्जा प्राप्त केला. ‘इंटरमेजो अ लव्ह स्टोरी’ मध्ये त्यांना एका अमेरिकन दिग्दर्शकानं पाहिलं आणि स्वतःच्या चित्रपटासाठी निवडलं. त्या कॅलिफोर्नियात आल्या आणि चित्रपटाच्या रीमेकमध्ये काम करू लागल्या. चित्रपट जगताने त्यांच्या आधुनिक सौंदर्य प्रतिभेचं कौतूक केलं.. हॉलीवुडला एक सशक्त अभिनेत्री मिळाली होती. प्रेक्षकात त्यांची लोकप्रियता वाढली होती. नंतर त्या तीन चित्रपटासाठीचा करार पूर्ण करायला स्वीडनला गेल्या. त्या फार विचारपूर्वक आपल्या भूमिका निवडत. ‘फॉर हूम द बेल टॉल्स’ मधील अभिनयासाठी त्यांना अकादमी पुरस्कारासाठी

नामांकीत करण्यात आले. ‘जॉन ऑफ अर्क’ 1948 सहित त्यांचे चारवेळा नामांकन झाले. 1949 मध्ये त्या फिल्म ‘स्ट्राम बॉली’ साठी इटलीत गेल्या आणि चित्रपट दिग्दर्शक रोबर्टो रोजेलिनी यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी आपल्या पती व पुत्रीला सोडून दिल्यावर अमेरिकन प्रेक्षक त्यांच्यावर नाराज झाले. त्या इटलीमध्येच थांबल्या तसेच आपल्या पुत्राला जन्माला घातले. 1952 मध्ये त्यांच्या घरी जुळ्या मुलीने जन्म घेतला. ज्या आपल्या काळातील पहिल्या मुलीप्रमाणेच त्यांच्या काळातल्या प्रसिद्ध अभिनेत्या बनल्या.1956 मध्ये त्या ‘अनास्टेशिया’ या चित्रपटासाठी हॉलीवूडला परतल्या, जी इंग्लडमध्ये चित्रित करण्यात आली. त्यांना या चित्रपटासाठी देखील दुसरा अकादमी पुरस्कार देण्यात आला.

युरोप व रशियात काम करीत असताना त्यांनी उत्कृष्ठ चित्रपट दिले. ‘होल्टासोनटिन’ 1978 मध्ये त्या पुन्हा एकदा अकादमीसाठी नामांकीत झाल्या. त्यांना तो मिळाला नसला तरी अनेकांनी मान्य केले की ती त्यांच्या जीवनातली चांगली कलाकृती होती. ‘अ वूमन कॉल्ड गोल्डा’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून ‘एमी पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट इस्त्रायली पंतप्रधान गोल्डा यांच्या जीवनावर आधारीत होता.
30 ऑगस्ट, 1982 ला इंग्रिड यांचा कैंसरने मृत्यू झाला.

Note: जर तुमच्याकडे About Anandmurti Gurumaa मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला  Ingrid Bergman Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button