महिलांनी आहारात बदल केल्याने मासिक पाळीतील वेदना होतील कमी |How to reduce prostaglandins naturally

दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमध्ये महिलांना पोट दुखी, चिडचिड, पाठ दुखी व सोबतच डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी या समस्यांना टाळण्यासाठी महिलावर्गांनी रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.

महिलांनी आहारात हे बदल करा? |How to reduce prostaglandins naturally

हर्बल चहा

मासिक पाळीमध्ये क्रॅम्प्स आणि वेदनांपासून आराम मिळण्यासाठी हर्बल टी घेणे फायद्याचे ठरते. तसेच कॅमोमाईल आणि पेपरमिंट चहा मुळे शरीराला आराम मिळतो.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट मध्ये फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. आणि डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने पीएमएस आणि वेदना कमी होण्यास मदत होते. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास मूड सुधारण्यास देखील मदत होते. यादरम्यान 80 टक्के पेक्षा जास्त कोको असलेले चॉकलेट खा.

हिरव्या पालेभाज्या

दर महिन्याला येणाऱ्या पाळीमुळे रक्त कमी होते आणि परिणामी शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अशा परिस्थितीत हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

हे सुध्दा वाचा: मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

बदाम,पीनट बटर आणि काळे बीन्स

महिलांनी आहारात बदाम, पीनट बटर आणि काळे बीन्स यांचा समावेश केल्यास शरीराला योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळते.

चीज, दही आणि दूध

महिलांनी योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. शिवाय या दरम्यानच्या काळात येणारा थकवा आणि बदलणारा मूळ यांसारखे पीएमएसची लक्षणे कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. चीज, दही आणि दूध हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले जातात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ