चवीला अत्यंत कडू परंतु आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितावह असा मेथीचा गुणधर्म आहे. मधुमेहाला आटोक्यात आणायला मेथीचा बराच उपयोग होतो. मेथी रात्रभर पाण्यात भिजवल्यावर ते पाणी दिवसभर प्यावे. असे नित्यनेमाने महिनाभर केले तरी मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना शरीरामध्ये आश्चर्यकारक बदल झालेला दिसून येतो. मेथी कडू असल्याने मधुमेहाच्या विकारात अत्यंत गुणकारी ठरली आहे. लघवीतून साखर जाण्याच्या विकारामध्येही वरील प्रमाणे उपाय केला असता गुण आल्याचे आढळून आले आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर करावयास हवा.
मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Fenugreek benefits in marathi
- थंडीमध्ये बहुधा वातविकार उफाळून येतात. अशा वेळेस सांधे दुखणे, आमवात, अंग मोडून येणे या सारखे विकार बळावतात. मेथीच्या सेवनाने उदाहरणार्थ मेथीची भाजी, मेथीयुक्त पाणी, मेथीचे लाडू व मेथीचे लोणचे यांचा आहारामध्ये समावेश केल्याने फायदा होतो.
- दिवसातून मेथीचा लाडू किमान एक तरी खावा. अंगदुखीवर अत्यंत गुणकारी असा मेथीचा लाडू बाळंतिणीस तर अवश्य द्यावा. त्यामुळे वातविकारांचा त्रास न होता अंगात शक्तीही येते. बाळंतपणानंतर येणाऱ्या वातविकारांच्या त्रासापासूनही मुक्तता मिळते.
- मेथीपाकाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात, आम्लपित्त, बाळंतरोग व नेत्ररोग यांवर नियंत्रण राखले जाते. शरीर संगोपनासाठी सकाळ-संध्याकाळ चमचाभर मेथीपाक दुधाबरोबर घ्यावा. शरीर संवर्धनासाठी मेथी तेलाचाही उपयोग केला जातो.
हे सुध्दा वाचा:– दालचिनी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- मेथी हे उत्तम दर्जाचे टॉनिक आहे. मेथीचे गुणधर्म वातहारक, वायुनाशक,वीर्यवर्धक, रक्तशुद्धीकारक व रसधातूपोषक असे आहेत.
- मेथीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचाही आहारामध्ये अंतर्भाव असणे आत्यंतिक जरुरीचे आहे. मलावरोधासारखे विकार दूर राखले जातात. पोट साफ राहते आणि रक्तशुद्धीचेही कार्य त्यामुळे होते.
- रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर या ना त्या मार्गाने झालाच पाहिजे. मेथी घातलेल्या चपात्या, मेथीची भाजी, ठेपला, मुठिया, लोणचे, लाडू या मार्गाने मेथी आपल्या पोटामध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मेथी चवीला जरी कडू असली तरी तिचे कार्य शरीराच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे आहे.
- रोज सकाळी थोडी थोडी मेथी खाल्ल्याने वायूविकार दूर होतो.
- मेथी व सुंठेचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आमवात दूर होतो. आमवातावर याचा चांगलाच फायदा होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.