अश्या पद्धतीने बनवा चण्याच्या करंज्या | How to make karanji recipe

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये चण्याच्या करंज्या कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

अश्या पद्धतीने बनवा चण्याच्या करंज्या | How to make karanji recipe

साहित्य

  • 2 वाट्या मैदा (1 किलो), 1 टेबलस्पून वनस्पती तूप, 1 चिमूट मीठ, तळायला तूप किंवा तेल, अर्धी वाटी मैदा पुरीला लावायला कृती
  • 1 टेबलस्पून वनस्पती तूप पातळ करून मैद्यात मिसळावे. मीठ व पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. करंज्या करण्यापूर्वी २-३ तास आधी पीठ भिजवावे.

पुरण

  • 3 किलो भाजलेले चण्याचे डाळे, 200 ग्रॅम सुके खोबरे, 3 किलो गूळ, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 3 टेबलस्पून खसखस, 1 चिमूट मीठ, 4-5 वेलच्या, थोडी जायफळपावडर, 2 टेबलस्पून साजूक तूप कृती
  • भाजके चण्याचे डाळे कढईत घालून मंद गॅसवर कोरडेच गुलाबी रंगावर भाजावे. सुके खोबरे किसून कच्चे मिक्सरमध्ये कोरडेच बारीक करावे व कढईत मंद गॅसवर फिकट गुलाबी रंगावर भाजावे. पांढरे तीळ व खसखस कोरडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे.
  • भाजलेले चण्याचे डाळे मिक्सरमध्ये कोरडे दळून घ्यावे व चाळणीने चाळून घ्यावे. नंतर या चाळलेल्या पिठात बारीक चिरलेला गूळ, भाजलेले खोबरे, भाजलेले तीळ व खसखस, तूप, वेलची-जायफळपावडर, मीठ घालावे व पीठ पुन्हा मिक्सरमधून काढावे म्हणजे गूळ पिठात चांगला मिसळेल व पुरण तयार होईल.

हे सुध्दा वाचा: अश्या पद्धतीने बनवा रवा आणि खोबऱ्याची करंजी

करंज्या बनवण्याची कृती

भिजवलेल्या पिठाच्या छोट्या गोळ्या करून पुऱ्या लाटाव्यात व एकेका पुरीत 1 टीस्पून पुरण घालून करंज्या कराव्यात व मंद गॅसवर तुपात तळून काढाव्यात. (करंज्या करण्याची कृती रवा करंज्यांप्रमाणे करावी.)

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ