अश्या पद्धतीने बनवा रवा आणि खोबऱ्याची करंजी | how to make karanji recipe in marathi

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये रवा आणि खोबऱ्याचे करंज्या कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

अश्या पद्धतीने बनवा रवा आणि खोबऱ्याची करंजी | How to make karanji recipe

साहित्य

2 वाट्या मैदा (3 किलो), 1 टेबलस्पून पातळ वनस्पती तूप, 1 चिमूट मीठ

कृती

तूप पातळ करून मैद्यात मिसळावे व मीठ घालून पाणी किंवा दूध घालून घट्ट पीठ भिजवावे व 2 तास ठेवावे.

साहित्य

2 वाट्या बारीक रवा किंवा (1 वाटी रवा व 1 वाटी गव्हाचे पीठ), 3 वाट्या सुके खोबरे किसून, 2 टेबलस्पून तूप, 1 टेबलस्पून खसखस, दीड वाटी साखर, 5-6 वेलच्या, थोडी जायफळपावडर, 1 चिमूट मीठ

कृती

  • रवा व गव्हाचे पीठ कढईत तूप घालून एकत्र गुलाबी रंगावर भाजावे.
  • सुके खोबरे किसून कच्चेच मिक्सरमध्ये कोरडेच बारीक करून घ्यावे..
  • नंतर खोबरे कोरडेच कढईत मंद गॅसवर किंचित गुलाबी रंगावर भाजावे. जास्त गुलाबी भाजू नये. खोबरे भाजल्यावर ते भाजलेल्या रव्यात मिसळावे. खसखस गुलाबी भाजून ती रव्यात मिसळावी.
  • रवा व खोबरे थंड झाल्यावर त्यात वेलची-जायफळपावडर, मीठ व साखर बारीक करून मिसळावी. सर्व चांगले मिसळून घ्यावे, म्हणजे पुरण तयार झाले.

हे सुध्दा वाचा: दिवाळीचा फराळ बनवताय मंग या ‘टीप्‍स’ नक्की फॉलो करा

कृती करंज्या

भिजवलेला मैदा पाट्यावर कुटून किंवा हाताने चांगला मळून घ्यावा. त्याच्या छोट्या पेढ्याएवढ्या गोळ्या करून घ्याव्यात. नंतर एकेक गोळी सुक्या घोळवून पोळपाटावर पुरीएवढी लाटून घ्यावी. एकेका पुरीवर मधोमध मैद्यात 1 टीस्पून तयार खोबऱ्याचे पुरण घालावे व पुरीच्या कडांना कापसाने दूध लावून पुरीची एक बाजू दुसऱ्या कडेवर घट्ट दाबून कडा चांगली चिकटवावी व करंजी कापण्याच्या कातणीने करंजी अगदी कडेने कापावी व कापलेली करंजी ओल्या फडक्यात झाकून ठेवावी म्हणजे सुकणार नाही.

याप्रमाणे 15-20 करंज्या तयार करून घ्याव्यात. नंतर कढईत वनस्पती तूप चांगले तापल्यावर मंद गॅसवर तेलात एका वेळेला 3-4 करंज्या सोडून तळून काढाव्यात. करंज्यांना किंचित गुलाबी रंग आला व कुरकुरीत झाल्या की बाहेर काढून ठेवाव्यात. तूप थंड होत आले की मधून मधून गॅस थोडा मोठा करावा. याप्रमाणे सर्व करंज्या तळून झाल्यावर थंड झाल्या की घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्यात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ