दिवाळीचा फराळ बनवताय मंग या ‘टीप्‍स’ नक्की फॉलो करा | Diwali faral preparation tips in marathi

‘दिवाळी’ हा भारतातील सर्वात मोठया प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळी हा सर्वांचा आवडता असा सण असल्यामुळे दिवाळी या सणाची सर्वजण वाट पाहत असतात. मनाला आनंद आणि उत्साह देणारा असा हा सण आहे. दिवाळी म्हटले की, नवीन कपडे घेणे त्याची आधीपासुनच तयारी करणे. त्याचप्रमाणे नवीन नवीन प्रकारचे फराळ बनवणे ही सर्व तयारी केली जाते.

दिवाळीतला फराळ हा खुप मोठया प्रमाणात केला जातो, आणि संपुर्ण दिवाळी मध्ये अगदी तुळशीच्या लग्ना पर्यन्त त्याचा आस्वाद घेतला जातो. आज आपण याच दिवाळीचा फराळ बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दिवाळीचा फराळ बनवताय मंग या ‘टीप्‍स’ नक्की फॉलो करा | Diwali faral preparation Tips

 1. करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप किंवा तेल गरम करून घातले म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात.
 2. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील.
 3. करंज्यांच्या पुरणात घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे म्हणजे खूप0दिवस झाले तरी करंज्या खराब होणार नाहीत.
 4. कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होतात व मऊ राहतात.
 5. डिंकाचे लाडू करताना डिंक साजूक तुपात तळल्यावर वनस्पती तुपापेक्षा तूप कमी लागते व लाडूही खूप दिवस मऊ राहतात. डालडा घातल्यास लाडू थंड झाल्यावर डालडा गोठून लाडू घट्ट होतात.
 6. डिंकाचे लाडू गुळाच्या पाकात घालून वळताना थोडे थोडे मिश्रण ताटात काढून थंड झाल्यावर वळावेत म्हणजे पटापट वळता येतात. मिश्रण गरम असेल तर हाताला चिकटते व लाडू पटापट वळता येत नाहीत.
 7. लाडवात घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घालावे. खोबरे न भाजताच घातले तर खोबरे खवट झाल्यामुळे लाडवाची चव बदलते.
 8. रव्याच्या लाडवाचा पाक जर जास्त कच्चा झाला व मिश्रण सुकले नाही तर थोडा पक्का पाक करून घालावा किंवा पाक पक्का झाला व लाडू वळताना भुगा0व्हायला लागला तर थोडा कच्चा पाक करून घालावा.
 9. मेथीच्या लाडवात घालायचे मेथीचे पीठ 3-4 दिवस आधी तुपात भिजवून ठेवले तर मेथीचा कडूपणा कमी होतो.
 10. कच्च्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी पोहे थोडे थोडे ओव्हनमध्ये घालून गरम करून घेतले म्हणजे कुरकुरीत होतात व चिवडाही चांगला होतो.
 11. तळलेल्या पोह्याचा चिवडा करण्यापुर्वी तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे पोहे घालून तळावेत म्हणजे पोहे चटकन फुलतात व तेलकटही होत नाहीत. पोहे तळताना गॅस मंद असल्यास पोहे चांगले फुलत नाहीत व तेलही ओढून घेतात व चिवडा तेलकट होतो.
 12. चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास घेतात व चिवडा तेलकट होतो. थोड्या वेळाने मऊ पडतील. चकली तळताना गॅस मधुन मधुन कमी-जास्त करावा. तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल व तेलही जास्त ओढून घेईल.
 13. शंकरपाळ्या, शेव किंवा तळणाचे कोणतेही पदार्थ करताना गॅस कमी-जास्त करावा. तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होईल. 14. एकतारी पाक- पाक मघापेक्षा जाड झाल्यावर हाताचा अंगठा व पहिले बोट पाकात बुडवून एकमेकाला चिकटवावीत व उघडबंद करावीत. पाकाची बारीक तार धरून अर्धवट तुटल्यास एकतारी पाक झाला.
  दोनतारी पाक- एकतारी पाकापेक्षा जास्त पक्का पाक होऊन पाकाची पक्की तार धरते व तार तुटत नाही. सलग 2-3 तारा येतात.
  गोळीबंद पाक- दोनतारीपेक्षा जास्त पक्का पाक करून पाकाचा थेंब थंड पाण्यात टाकून बघावा. पाकाची कडक गोळी होते. पाकाची तार पाण्यात टाकल्यास तार कडक होते व हाताने कटकन तुटते.
 14. शेंगदाणा-कुटाची तसेच राजगिरा लाह्यांची चिक्की शेंगदाण्याच्या पाकातील लाडवाप्रमाणेच करावी.
 15. अळीव फुगण्यासाठी नारळाच्या पाण्यातही भिजत घालतात. भिजलेला अळीव जास्त बुळबुळीत होतो व ते लाडू लवकर खराब होतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button