आरोग्य विमा काढण्याचे आहेत ‘हे’ फायदे | Health insurance benefits in marathi

आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्यातील अनेक लोक अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी घेतात. यामध्ये प्रामुख्याने जीवन विम्यापासून ते आरोग्य विम्यापर्यंतचा समावेश होतो. आरोग्य विमा अर्थात Health insurance benefits तुम्हाला तुमच्या उपचाराचा खर्च भरून काढण्यास मदत करतो. यामुळे कुटुंबातील सदस्यावर आर्थिक बोजा पडत नाही. म्हणून आता कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा घ्यावा याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे.

भारतीय बाजारात अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना आहेत. या आरोग्य विमा लोक त्यांच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार निवडू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते आरोग्य विमा योजना घेताना सावधगिरी बाळगायला पाहिजे आणि स्वतःसाठी योग्य आरोग्य विमा कवच निवडायला पाहिजे. असे केल्यास तुमच्या हॉस्पिटललायझेशनच्या खर्चाची चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होते. विशेष म्हणजे आरोग्य विम्याअंतर्गत तुम्हाला बरेच फायदे होतात. त्यामुळे आज आपण आरोग्य विमा घ्यावा आणि त्याची काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.

आरोग्य विमा काढण्याचे आहेत ‘हे’ फायदे | Health insurance benefits in marathi

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आरोग्य उपचारावर येणारा खर्च देखील वाढत आहे. तुम्ही कोणत्याही गंभीर आजारांसाठी किंवा सामान्य आजारांसाठी रुग्णालयात दाखल होत असल्यास होत असाल तर या महागाईत तुम्ही प्रामुख्याने तुमची बचत गमावू शकता.

म्हणूनच आरोग्य तज्ञांनी आवर्जून आव्हान केले आहे की प्रत्येक व्यक्तीने आरोग्य विभाग घ्यावा कारण या आरोग्य विमाची कधीही गरज भासू शकते.

आरोग्य विमा घेण्याचे आहेत हे महत्त्वपूर्ण फायदे

उत्तम वैद्यकीय उपचार

आरोग्य विम्यामुळे तुम्हाला उत्तम दर्जाचे वेळी वैद्यकीय उपचार मिळतात. तसेच आरोग्य विमा अंतर्गत खर्चाची चिंता न करता तुम्ही तुमचे उपचार सुविधापूर्ण चांगल्या ठिकाणी मिळू शकता.

वैद्यकीय खर्च नियंत्रित होतो

तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसीचे कवच परिधान केले असेल तर तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चाची भरपाई होण्यास मदत होऊ शकते. रुग्णालयांत दाखल होण्यापूर्वी किंवा दाखल झाल्यानंतरच्या खर्चासह वैद्यकीय खर्च वाढला तरी तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही.

हॉस्पिटललायझेशन अर्थात रुग्णालयातील खर्च

आरोग्य विमा पॉलिसी 24 तासापेक्षा जास्त काळ ॲडमिट झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने खोलीचे भाडे, डॉक्टरांचे शुल्क, औषधाच्या शुल्क, निदान चाचणी शुल्क यांचा समावेश होतो.

हे सुध्दा वाचा – हेल्थ इन्शुरन्स घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा

हॉस्पिटललायझेशन पूर्वीचा आणि नंतरचा खर्च

यामध्ये प्रामुख्याने हॉस्पिटललायझेशन पूर्वी कोणत्याही आजारावर झालेल्या वैद्यकीय खर्च तसेच सुट्टी झाल्यानंतरच्या उपचारावर झालेल्या खर्चाचा समावेश होतो. विमा पोलीस तयारी केल्यावर काही दिवसांसाठी प्री-हॉस्पिटल आणि हॉस्पिटललायझेशन नंतरचा खर्च कव्हर केला जातो.

बचत सुरक्षित ठेवते

आरोग्य विमा पॉलिसी प्रामुख्याने तुमची बचत सुरक्षित ठेवते. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल आणि आरोग्य समस्यांच्या काळात ती गमवावी लागली तर तुमची सर्व बचत संपवू शकते. पण जर तुम्ही विमा आरोग्य पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही तुमची बचत करू शकता.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ