चिंचाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Health benefits of tamarind in marathi

मित्रांनो चिंचेचा (tamarind) स्वाद आंबट, गोड व थोडासा तुरट असतो. पिकलेल्या चिंचेचा उपयोग आमटी-भाजीला आंबटपणा आणण्यासाठी व स्वादिष्ट बनविण्यासाठी होतो.पण आज आपण या पोस्टमध्ये चिंचाचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

चिंचाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Health benefits of tamarind in marathi

 • चिंच पाण्यात भिजत घालून चांगली कुसकरून घ्यावी. नंतर ते पाणी गाळून प्यायल्याने पित्तामुळे होणारी उलटी बंद होते. त्या पाण्यात साखर घालून प्यायले असता उष्माघातातही फायदा होतो.
 • एक किलो चिंच पाण्यात भिजत ठेवावी. नंतर थोडी कुसकरून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. त्यात साखर घालून तयार केलेले हे सरबत रात्री घेतल्यास मलावरोध तर सकाळी उठून घेतल्यास पित्तविकार दूर होतात.
 • वरील प्रकारे सरबत करून त्यात लवंग, मिरपूड, कापूर घालून घेतल्याने अरुची दूर होते.
 • चिंचेच्या पाण्यात मीठ घालून प्यायल्याने शौचास साफ होते.
 • चिंचेच्या पानांना वाटावे व त्यात सैंधव घालून हे मिश्रण गरम करावे. संधिवात, सांधे आखडणे यांच्या त्रासात ह्या मिश्रणाचा लेप सहन होईल इतपत गरम करून लावावा.
 • मुरगळणे, मुकामार, अस्थिभंग झाला असता चिंच व आवळ्याची पाने वाटून त्याचा लेप लावावा.
 • डोळे सुजल्यावर चिंचेची पाने वाफवून त्याचे पोटीस करून डोळ्यांवर बांधावे. चिंचेच्या पानांचा रस काढून तो साखरेतून खावा. संग्रहणी दूर होते.

हे सुध्दा वाचा:ज्वारी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • चिंचेची (tamarind) पाने तांदुळाच्या ध्रुवणात वाटून प्यायल्याने अतिसारामध्ये फायदा होतो.
 • मूळव्याधीमध्ये चिंचेची फुले वाटून त्याचा रस घ्यावा किंवा चिंचेच्या फुलांची भाजी करून त्यात दही, धने, सुंठ व डाळिंबाचा रस घालून जेवणाच्या वेळी खावी. मूळव्याध बरी होते.
 • चिंचेची फुले व चिंचोक्यातील गर बारीक वाटून ते मिश्रण शरीरभर चोळावे. घाम येणे, शरीर दुर्गंधीत होणे या तक्रारी दूर होतात.
 • गळू पिकावे म्हणून तेथे चिंचोका वाटून लावावा.
 • शरीरावरील सूज व ठणका यांचा त्रास होऊ लागल्यास चिंचेची पाने वाटून दुखऱ्या भागावर त्याचा लेप करावा.
 • चिंच थंड व आंबट असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास खोकला, दमा, सांधे धरणे, संधिवात आदी त्रास होतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button