मित्रांनो तीन ते चार हात उंचीच्या ज्वारीच्या रोपांना कणसे लागतात व त्यातूनच ज्वारीचे (Sorghum) दाणे मिळतात. ज्वारीची कोवळी कणसे भाजून त्याचा चविष्ट हुरडा तयार केला जातो. हुरड्याचे शौकीन हुरडा पार्टी आयोजित करून इतरांनाही आपल्या आनंदात सामावून घेतात. सर्वसाधारणपणे ज्वारी पांढऱ्या व लाल रंगामध्ये मिळते. आज आपण या पोस्टमध्ये ज्वारी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
ज्वारी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Sorghum health benefits in marathi
- ज्वारी थंड, गोड, रक्तविकारहारक, पित्तशामक, रूक्ष असून कफ व वायुकारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक असून मूळव्याध, अरुची, व्रण पडणे यांवर उपयोगी पडते. लाल ज्वारी पौष्टिक, थंड, गोड, बलदायी, त्रिदोषहारक मात्र किंचित कफकारक असते.
- गुरे धष्टपुष्ट होण्यासाठी त्यांना ज्वारीच्या पिकाचा कडबा खाऊ घालावा.
हे सुध्दा वाचा:– तांदळाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?
- ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ कमी होतो. तसेच लाह्यांच्या पिठाचा काढा करून प्यायल्याने घाम सुटतो.
- ज्वारीपासून बनवलेली कांजी कफ व वायुनाशक असून मूळव्याध व प्रमेह यांवर गुणकारी ठरते.
- ज्वारीची भाकरी थंड व वायूकारक असते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.