द्राक्ष खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे |Health Benefits Grapes in Marathi

भारतात पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिकतात. गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात द्राक्षे होतात. महाराष्ट्रात पुणे, सातारा, लागवड होते. नाशिक आणि खानदेश परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचीद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. अनाबशाही, सीडलेस, साखरी भोकरी, ब्लॅक प्रिन्स अशी द्राक्षांच्या प्रकारांची नावे आहेत. द्राक्षाचे वेल असतात. तीन वर्षानंतर द्राक्षांचे उत्तम घड लागतात. फेब्रुवारी – मार्च दरम्यान उत्तम आणि रसाळ फळे येतात.

महाराष्ट्रात द्राक्षाची कृत्रिमरित्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. पण कॉकशस पर्वत, कॅस्पियन समुद्राचा दक्षिण भाग, आशिया खंडाचा पश्चिम भाग, युरोपच्या दक्षिणेकडील भाग, अल्जेरिया, मोरोक्को देशात तर नैसर्गिकरित्या द्राक्षवेल मोठ्या प्रमाणात येतात. उत्तम प्रतीच्या द्राक्षाची पद्धतशीर लागवड युरोपात फ्रान्स आणि इटलीमध्ये तर अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे मोठ्या प्रमाणात होते.द्राक्षे दोन प्रकारची असतात. काळी द्राक्षे गुणकारी असतात. तर पांढरी द्राक्षे मधुर पण महाग असतात.

द्राक्षांमध्ये उत्तेजित करण्याचा आणि प्रसन्नता देण्याचा नैसर्गिक गुण आहे. द्राक्षाने शरीरात स्फूर्ती आणि उत्साह सळसळतो. सर्दी, मानसिक अस्वस्थता आणि श्वासविकारात द्राक्षे फायदेशीर होतात. ज्यांची त्वचा शुष्क, शरीर दुर्बल असेल, वजन वाढत नसेल तर द्राक्षे खावी. लाभ होतो. ज्यांना डोळ्याचा विकार आहे, चष्म्याचा नंबर वाढला आहे, डोळ्यांची आग होते अशा तक्रारींवर द्राक्षे किंवा द्राक्षाचा रस फारच परिणामकारक होते.

द्राक्ष खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | Health Benefits Grapes in Marathi

द्राक्ष : सौम्य रेचक

द्राक्षांचा सौम्य रेचकसाठीही उपयोगी होतो. ज्यांना जीर्ण मलावरोध आहे अशांनी दिवसातून एकदा थोडीतरी द्राक्षे खावीत. द्राक्षाने शौचास नरम होते. मुळव्याधीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. द्राक्षामध्ये ‘सी’ जीवनसत्त्व असते. हे ‘सी’ जीवनसत्त्व स्कर्व्ह आणि त्वचारोगावर रामबाण आहे. त्यांच्या अभावामुळे स्कहीं आणि त्वचारोगाचा प्रादुर्भाव शरीरात होतो.’ज्यांना पित्ताचा त्रास असेल आणि पित्तामुळे उलट्या होत असतीलतर द्राक्षे चावून खाल्ल्याने उलट्या तत्काळ थांबतात. सुक्या द्राक्षामध्ये बेदाणे, मनुका आणि किसमिस असे तीन प्रकार आहे. बेदाणे पांढरे असतात आणि त्याला बी नसते. मनुका काळ्या रंगाच्या असतात. किसमिस बेदाण्यासारख्याच असतात, पण बेदाण्याहून लहान असतात.

खोकला आणि द्राक्षे

ज्यांना खोकल्याचा त्रास होतो अशांनी द्राक्ष आणि साखर तोंडात ठेवावी आणि त्याचा रस चघळावा. खोकला कोरडा असल्यास द्राक्ष, आवळा, खजूर, पिंपरी, मिरी यांचे एकत्र चूर्ण करावे. त्यातले पाव तोळा चूर्ण दिवसा तीन वेळा प्रत्येक वेळी चटणीसारखी घ्यावे. खोकला येताना दुखत असेल आणि थुंकितून रक्त पडत असेल तेव्हा द्राक्ष आणि धमासा नावाची वनस्पती प्रत्येक एक एक तोळा घेऊन त्याचा उकाळा करून प्यावा.

आमवात आणि आम्लपित्त यात द्राक्ष आणि बाळहिरडा समप्रमाणात घेऊन कुटावे. नंतर त्यात प्रमाणशीर साखर घालून एक – एक तोळ्याच्या हाताने गोळ्या करा आणि सकाळ – संध्याकाळ घ्याव्या.

द्राक्षाचे सरबत

द्राक्षाचे सरबत क्षयरोग आणि उष्णतेच्या विकारात फारच फायदेशीर आहे. 120 तोळे पाण्यात 108 तोळे साखर घालावी आणि विस्तवावर ठेवावे. उकळी फुटल्यावर 80 तोळे द्राक्षाचा ताजा रस घालावा. हा एकतारी पाक बनवून थंड झाल्यावर ते बरणीत भरून ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे सरबत नियमित घ्यावे.

सरबत रुचकर बनवायचे असेल तर सरबत बनविण्याची आणखी एक रीत आहे. 10 तोळे बी नसलेली पांढरी द्राक्षे घ्यावीत आणि लिंबाच्या रसात ती वाटावीत. त्यात तेवढेच पाणी घालावे आणि एकजीव करून फडक्याने गाळून घ्यावे. त्यात पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्याचा ४० तोळे रस घालावा. त्यानंतर 80 तोळे साखर घालून त्याचा पाक करावा आणि हे सरबत बाटलीत भरून ठेवावे. दररोज सकाळ संध्याकाळ दोन ते अडीच तोळे हा पाक घालून सरबत करून घेतल्यास पित्तविकारात फारच उपयोगी होते. हे सरबत रुचकर असल्यामुळे घरात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतालाही उत्तम आहे. द्राक्षाच्या सरबताचा रुचकर आणि पाचक स्वाद पाहुण्यांनाही अनोखा वाटेल.

पंचामृत चाटण

तोंडाला अरुची असेल, मलावरोधाचा त्रास असेल किंवा कफाचा त्रास असणाऱ्यांनी पंचामृत चाटण म्हणून ओळखली जाणारी चटणी करून उपयोगात आणावी. 1 तोळा सुंठ, 1 तोळा मिरे, 1 तोळा पिंपरी आणि एक तोळा सैंधव घेऊन एकत्र कुटावे आणि त्याचे वस्त्रगाळ चूर्ण बनवावे. त्यात 40 तोळे बी नसलेली द्राक्षे कुटून त्याची चटणी करावी. ही चटणी फारच रुचकर असते.

पायोरियात द्राक्षबिया गुणकारी

द्राक्षाच्या बियांच्या चूर्णात भीमसेनी कापूर मिसळून त्याचे दंतमंजन तयार करावे. हे दंतमंजन मुखदुर्गंधी, दात हलणे, दातातून पू येणे, पायोरिया इत्यादि विकारांत गुणकारी आहे. द्राक्षाच्या पानांचा रस 1 तोळा आणि घायपातीच्या पानाचा रस 1 तोळा हे मिश्रण दिवसातून तीन – चार वेळा घेतल्यास लघवीतून पू जाण्याचे प्रमाण कमी होते.

मुतखड्यावर द्राक्षाची पाने

द्राक्षाच्या पानाचा रस 1 तोळा आणि गाजराचा रस 1 तोळा मिश्रण करून रिकाम्या पोटी घ्यावा. त्याने मुतखडा होत नाही. लबवीही साफ होते. जलोदर रोगात हे मिश्रण दिल्यास मूत्र प्रवृत्ती वाढून रोग आटोक्यात येण्यास मदत होते.

असा आहे द्राक्षाचा उपयोग कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी मुकाबला करणारी द्राक्षे म्हणजे नैसर्गिक मेवाच आहे द्राक्षांपासून तयार झालेले ‘द्राक्षासव’ हे औषध तर फारच लोकप्रिय आहे. दिवसातून 20 तरी मनुका स्वा आणि निरोप, प्रसन्न आणि सतेज रहा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ