पैशांची गुंतवणूक का बर करावी ? | Why To Invest Money Information in Marathi

आपल्या सर्व गरजा आणि हेतु पूर्ण करण्यासाठी जिवनांचा प्रत्येक पाऊलावर आपल्याला पैशांची गरज भासत असते. पण वाईट गोष्ट हि आहे कि आपल्यापैकी अनेक जण आर्थिक बाबीविषयी निष्काळजीत असतात आणि यामुळेच आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे नियोजन कसे करायचे याबाबत सांगणार आहोत.

पैशांची गुंतवणूक का बर करावी ? | Why to invest money

पैशांची गुतवणूक वा बर करावी याबाबत अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. पण ति किती महत्त्वाची असते हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. हेच सगळ आपल्याला एकदम बेसिक पासून जाणून घ्यायच आहे. आता आपण गुंतवणूक विषय बेसिक पासून जाणून घेणार आहोत . पण त्याआगोदर व्यक्तिगत जीवनात गुंतवणुकीचे काय महत्व आहे ते समजून घेऊया.

दिवसेन दिवस महाभाई वाढत चालली आहे, आणि काळ पण बदलत चाललाय. पैसा हा सर्वाचा जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणायला म्हणलो कि, पैशाशिवाय आपण आयुष्य जगु शकतो. जीवनात पैसाच सर्व काही नाही. अस आपण म्हणतो पण, पैशाची गरज ही सर्वांनाच आहे. त्यासाठीच आपण रात्रंदिवस झटत असतो. पण पैसे कमवण्यासोबतच पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करणे पण,तेवढंच महत्त्वाचं आहे.

ज्यामुळे तुम्हाला चांगली मिळवत मिळू शकेत आणि त्याद्वारे तुमच्या परिवाराचे भविष्य सुरक्षित होऊ शकेल. त्यामुळेच इन्केटमेन्ट (investment) आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग (investment planning ) हे शब्द आजकाल खूप प्रचलित झाले आहेत. आणि है खूप महत्वाचे सुद्धा आहे.

गुंतवणूक का करावी? हे जाणून घेण्याअगोदर आपण बचत, महागाई आणि गुंतवणूक या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

बचत म्हणजे काय ? | What is savings

एखादी व्यक्ती निश्चित कालावधीत जी पण कमाई करतो आणि त्यामधील काही भाग हा आपल्या जीवनातील उदरनिर्वाहासाठी खर्च करतो आणि त्यानंतर जी काही रक्कम किंवा पैसे उरतात. तिला आपण बचत असे म्हणतो.या बचतीचा उपयोग भविष्यातील खर्च आणि गरजा भागविण्यासाठी करतो.

बचत विषयी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हण आपण काही बचतीचे पैसे है बँकेत ठेवतो म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण ती काढू शकू. पण ती बचत तशीच खात्यात ठेवल्यावर आपला फायदा होतो का? तुम्ही विचार करा आणि आम्हाला कॅमेट मध्ये सांगा.

पण आमचं म्हण अस आहे कि, भविष्यात तुम्ही त्या बचतीचा चांगल्याप्रकारे उपयोग करू शकाल. यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत.याला आपण आर्थिक भाषेत गुंतवणूक असे म्हणतो.

महागाई म्हणजे काय ? | what is Inflation?

या पहिले आपण बचन बदल जाणून घेतल. आता आपण महागाई म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया.महागाई म्हणजे असा दर, ज्या दराने जीवन धोरणातील चर्च वाढतो आणि पैशाचे मुल्य घटते. सोप्या भाषेत सांगायच जर झाल तर सध्या ज्या किंमतीत एखादी वस्तुची खरेदी केली जाऊ शकते.

त्याच वस्तुची खरेदी भविष्यात तेवढ्याच किंमतीत केली जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे भूतकाळात ज्या किंमतीत वस्तुची खरेदी केली जात होती, त्यांच किंमतीत त्या वस्तूंची खरेदी सध्या वर्तमान काळत केली जाऊ शकत नाही.अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी निश्चित कालावधीत एखादी वस्तू किंवा सेवेच्या मूल्यात जी वाढ होते त्याला ‘महागाई’ असे म्हणतात.

गुंतवणूक म्हणजे काय ? | What is Investments ?

आपल्या जवळ जे एकूण पैसे असतील त्यातून सर्व खर्च केल्यानंतर जे पैसे उरतील त्यातूनच भविष्यात अधिक उत्पन्न होईल म्हणून त्याचा विविध पर्यायांमध्ये लॉक करणे म्हणजेच उदाहरणार्थ- सोने, बँक, एफडी, पोस्ट ऑफिस स्कीम, पीपीएफ, म्युच्युअल फंड, शेअर्स मार्केट इत्यादी मध्ये जे पैसे गुंतवतो त्याला आपण आर्थिक भाषेत ‘गुंतवणूक’ असे म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यासाठी ही संपूर्ण पोस्ट आहे ती म्हणजे गुंतवणूक का करावी? आणि ती एवढी महत्त्वाची का बर आहे. ते थोडक्यात जाणून घेऊया.

गुंतवणूक का बर करावी ? Why to invest

अनेक जण असे विचार करतात की, गुतवणूकीची का बर एवढी आवश्यकता आहे? फक्त पुरेशी बचत का नाही ? जास्त करून असे प्रश्न युवा पिढी मध्ये येत असतात. या प्रश्नाच उत्तर आपण एका उदाहरणासह समजून घेऊया.

उदाहरण: –

आपले वडील तरुण होते तेव्हा त्या काळात सिनेमा टिकिट हे 1 ते 2 रुपय एवढं होत. आणि तेचं सिनेमाचं तिकीट आज, 100 ते 200 रुपये आहे. त्या काळात लोकांना 200 ते 400 रूपये पर्यंत महिना पगार होता आणि तोच पगार आता 20000 ते 40000 हजारापर्यंत आहे. हे सगळं महागाईमुळे झालं आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वस्तूचा भाव वाढतो त्याचप्रमाणे आय ही वाढते.

आता थोडा विचार करा की, आपल्या वडिलांनी त्या काळात असा विचार केला असता कि, या एक रुपयांची बचत मी म्हातारपणी सिनेमा पाहण्यासाठी करतो. तर या काळात त्या एक रुपयाची किंमत ही एक रुपयाच्या चॉकलेट बरोबरची आहे.

या उदाहरणावरून असे स्पष्ट होते की, काळानुसार रूपयाच्या किंमतीत नोंदपात्र घट झाली आहे. त्यामुळे या महागाई नावाच्या दैत्यासोबत लढण्यासाठी आपल्या पैशाची बचत पूरेशी नाही परंतु त्याचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे ज्यामुळे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यात वेळेनुसार वाढ होईल.आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत की गुंतवणुकीचे नियोजन करणे का महत्त्वाचे आहे. चला तर मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो भेटू पुढच्या पोस्टमध्ये.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button