प्रामाणिकपणाचं महत्व काय असतं ते रुबेंझ गोंझालेस यांच्याकडून शिकावं…

मित्रांनो आपण एकदा तरी खोटं बोललो असेल, पण त्या खोटं बोलण्याने एखाद्याचे किती मोठं नुकसान होऊ शकतं हे आपल्या लक्षात येत नाही. पण एखादी गोष्ट प्रामाणिकपणाने केली तर आपल्या मनाला खूप चांगलं वाटतं. कारण आपण त्या ठिकाणी खरं बोललो असतो. अशीच एक प्रामाणिकपणाची प्रेरणादायी गोष्ट आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहे.मित्रांनो पोस्ट नक्की वाचा.

प्रामाणिकपणाचे महत्व काय असतं ते रुबेंझ गोंझालेस यांच्याकडून शिकावं | Success story of Ruben Gonzalez in marathi

रुबेंझ गोंझालेस (Ruben Gonzalez) यांची ही कहाणीदेखील अशीच अनोखी आणि मार्गदर्शक आहे. ते एकदा जागतिक रॅकेटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना खेळत होते. शेवटच्या गेममध्ये मॅच पॉइंटच्या वेळी मार्क वाढविण्यासाठी गोंझालेसने एक अप्रतिम फटका मारला. रेफरी आणि लाइनमन दोघांनीही फटका बरोबर असल्याचे मान्य केले आणि रुबेंझ गोंझालेस अजिंक्य ठरले होते. गोंझालेस क्षणभर अडखळले; परंतु लगेचच त्यांनी पुढे होऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन केले आणि ते म्हणाले, “माझा तो फटका चुकीचा होता.” परिणामी त्यांनी नोकरी गमावली आणि जिंकलेला सामनाही ते हरले.

स्पर्धेतील जेतेपदही त्यांनी गमावले. सर्व दर्शक गोंधळून गेले. नियमानुसार स्वतःच्या बाजूने विजय निश्चित असताना एक खेळाडू आपली चूक मान्य करून स्वतःहून सामना हरेल, अशी कल्पनासुद्धा कोणी करू शकत नव्हते; परंतु ही गोष्ट प्रत्यक्ष घडत होती! नंतर जेव्हा आपण असे का केलेत?” असा प्रश्न गोंझालेस यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “माझी सचोटी, माझा प्रामाणिकपणा आणि माझी सदसद्विवेकबुद्धी यांच्याशी मी कशी प्रतारणा करणार?” गोंझालेस सामना हरले; पण जेता ठरले. कोणतेही पदक न मिळतादेखील माणुसकी जेता ठरू शकतो. काही पराभव हे विजयापेक्षा आयुष्य उन्नत करणारे ठरतात. हृदयातील माणुसकी विजयापेक्षाही जास्त मोलाची असते.

या दोघांनीही अंतिम पदके मिळवली नाहीत तरीही खेळांच्या इतिहासात त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली व अजरामर झाली. अनेक माणसांच्या हृदयात ही नावे कोरली गेली आहेत. खेळातील चैतन्याचा जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा ही नावे नक्कीच आठवतील. अनेक सुवर्णपदके मिळवणाऱ्यांच्या यादीत त्यांची नावे नसली, तरी लॉरेन्स लेमी आणि रुबेंझ गोंझालेस ही नावे सदैव आपल्या स्मरणात राहतील हे मात्र निश्चित.

आपल्या आयुष्यातही अनेकदा अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. कदाचित आपण खेळत असणारा खेळ वेगळा असेल. आपण वापरीत असणारी बोट किंवा बॅट वेगळी असेल; परंतु त्यामागील आव्हाने मात्र सारखीच.

स्वतःची ‘प्रगती’ विरुद्ध व्यापक अर्थाचा “चांगुलपणा’ आपण यापैकी कशाला अग्रक्रम द्यायला हवा, हे आपण ठरवू शकतो का? वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून व्यापक चांगुलपणा आपण जपू शकूत का? बऱ्याच वेळा आपण म्हणतो की, मोठेपणाचा मार्ग नेहमीच गटांमधून, सहकाऱ्यांमधून जातो; परंतु जेव्हा वैयक्तिक स्वार्थाचा प्रश्न येतो तेव्हा इतरांबद्दल आपल्याला किती आस्था असते? आपल्या सहकाऱ्यांपेक्षा आपल्यालाच पदोन्नती मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो.

जेव्हा आपण वृद्ध म्हणून जगात वावरू तेव्हा इतरांना काय शिकवण देणार? आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे, हा विचार निश्चित करायला हवा. आपलं सुवर्णपदक कशात आहे, हे ठरवायला हवं. लॉरेन्स लेमी आणि रुबेंझ गोंझालेस यांची आठवण करा. खरा प्रश्न आपण लॉरेन्स लेमी आणि रुबेंझ गोंझालेस यांच्या जागेवर असतो तर काय केलं असतं हा नव्हे, तर आपण आयुष्यात त्यांच्या विचारांचे अनुकरण कितपत करतो, हा आहे.मित्रांनो पोस्ट आवडल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा.आणि हो भेटू पुढच्या पोस्ट मध्ये.

Note:- तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button