ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचा जीवन प्रवास | Dev Anand Biography in Marathi

हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशके आपल्या अभिनयाची जादुई छाप सोडणारे सदाबहार अभिनेते देव आनंद (Dev Anand) अर्थात धर्मदेव पिशोरीमल आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 ला पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील, शंकरगढ या गावी झाला. देव आनंद यांच्या आई गृहिणी होत्या व त्यांचे वडील अर्थात पिशोरीमल आनंद हे पेशाने वकील होते.

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचा जीवन प्रवास |Dev Anand Biography in Marathi

देव आनंद यांचे शालेय शिक्षण ‘सॅक्रेड हार्ड स्कूल’ येथून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी लाहोर गव्हर्नमेंट कॉलेज मधून इंग्लिश लिटरेचर मधून B.A या शाखेची पदवी संपादन केली.तसेच देव आनंद हे हिंदी, उर्दू, इंग्लिश या भाषा बोलण्यात तरबेज होते.पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देव आनंद यांनी मुंबई गाठली.त्यानंतर त्यांनी मिलिट्री सेन्सर ऑफिस मध्ये लिपिकाची नोकरी केली.

देव आनंद यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण हे 1946 साली प्रदर्शित झालेला ‘हम एक है’ या चित्रपटातून झाले. पण या सिनेमाने तिकिट खिडकीवर घोर निराशा केली. त्यानंतर देव आनंद यांच्या ‘जिद्दी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला व त्यांना या चित्रपटाने ओळख निर्माण करून दिली.

जिद्दी या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी काही उल्लेखनीय चित्रपटात काम केले. त्यातील त्यांचे, टॅक्सी ड्रायव्हर, बाजी, जाल, सी.आय.डी, कालापानी, कालाबाजार, हम दोनो यांसारखे चित्रपट विशेष गाजले.

देव आनंद यांच्या सुरुवातीच्या बहुतेक चित्रपटांचे निदर्शन गुरुदत्त यांनी केले होते. त्यानंतर देव आनंद यांनी आपल्या बंधूंना म्हणजेच चेतन आनंद यांना सोबत घेऊन ‘नवकेतन बॅनरची’ स्थापना केली. त्यानंतर या बॅनर अंतर्गत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली. त्यातील गाईड, ज्वेल ठीफ, जॉनी मेरा नाम है सिनेमे विशेष गाजले.

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर देव आनंद यांनी निर्माता, निदर्शक व लेखक म्हणून आपली कारकीर्द गाजवली.त्यांनी निर्माण केले चित्रपट हरे राम हरे कृष्णा, स्वामी दादा, हम नौवजवान, आनंद और आनंद हे सिनेमे विशेष गाजले.

हे सुध्दा वाचा- सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते सुनील दत्त यांचा जीवन प्रवास

देव आनंद यांच्या वैवाहिक आयुष्यबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या विवाह 1954 मध्ये अभिनेत्री ‘कल्पना कार्तिक’ यांच्यासोबत झाला होताआपल्या चित्रपट सृष्टीतील बहुमूल्य योगदानासाठी देव आनंद यांना 2002 साली ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 2001 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.देव आनंद आपल्या चित्रपटात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत (त्यातील टीना मुनीम, तब्बू, झीनत अमान या अभिनेत्रींनी पुढे हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.)

देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद व विजय आनंद हे चित्रपट सृष्टीतील नावाजलेले निदर्शक व पटकथा लेखक होते.आपल्या सहा दशकांच्या जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सदाबहार अभिनेत्याने 30 डिसेंबर 2011 ला या जगाचा निरोप घेतला.

Note: जर तुमच्याकडे Biography of Dev Anand in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Dev Anand information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button