‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवप्रवास…| Rishi Kapoor Biography in marathi

हिंदी चित्रपट सृष्टीचे ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर ( Rishi Kapoor ) यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 ला मुंबईत झाला. त्यांचे वडील महान कलाकार,निर्माता, निर्देशक राज कपूर होते व त्यांच्या आईचे नाव कृष्णा राज कपूर होते.ऋषी कपूर यांचे शालेय शिक्षण हे मुंबई येथील कैपियन हायस्कूल मुंबई येथून तर महाविद्यालयीन शिक्षण मेयो कॉलेज अजमेर येथून पूर्ण झाले.

अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवप्रवास…| Rishi Kapoor Biography in marathi

ऋषी कपूर यांना बालपणापासूनच अभिनयाचे वेडे होते.राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘श्री 420’ या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर राज कपूर निर्माता-निदर्शित ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमातून त्यांनी हिंदीत चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. (मेरा नाम जोकर या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती). या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली व या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पात्राला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

त्यानंतर 1973 सारी प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटाने ऋषी कपूर यांना प्रस्थापित अभिनेत्यात बसविले. व आपल्या पहिल्याच प्रमुख भूमिका असलेल्या बॉबी या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला.

बॉबी या चित्रपटानंतर ऋषी कपूर यांचे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रस्थ वाढले व त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक दर्जेदार चित्रपट दिलेत त्यातील त्यांचे राजा, रफूचक्कर, लैला मजनु, रंगीला रतन, दूसरा आदमी, अमर अकबर एथोनी, नया दौर हे सिनेमे विशेष गाजले.

ऋषी कपूर यांच्या सुरुवातीच्या चॉकलेटी व रोमँटिक भूमिका प्रेक्षकांना आवडू लागल्या. त्यानंतर 1980 च्या दशकात त्यांनी मल्टी स्टार चित्रपटात (म्हणजेच व्यावसायिक) चित्रपटात भूमिका केल्या त्यातील त्यांचे नशीब, अमर अमर अकबर एथोनी, कभी-कभी, कुली हे सिनेमे विशेष गाजले.

1980 च्या दशकात त्यांची जोडी अभिनेत्री नीतू सिंह यांच्या सोबत विशेष जमली या जोडीने सिनेसृष्टीला कभी-कभी, जहरीला इन्सान, जिंदा दिल, खेल खेल मैं. अमर अकबर अँथोनी यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. अभिनेत्री नीतू सिंह यांच्यासोबत त्यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांना विशेष भावली या जोडीने तब्बल 12 चित्रपटात सोबत काम केले‌.एकीकडे ऋषी कपूर यांच्या सिनेकारकिर्दीत चित्रपट सृष्टीवर ‘अमिताभ बच्चन’ नावाचे वलय असताना त्यांनी आपली छाप सिनेसृष्टीवर सोडली. 1990 च्या दशकात त्यांनी आपला मोर्चा कौटुंबिक तसेच स्त्रीप्रधान चित्रपटाकडे वळविला त्यातील त्यांचे घर घर की कहानी, चांदणी, प्रेम रोग, दामिनी हे सिनेमे विशेष गाजले.

ऋषी कपूर हे त्या अभिनेत्यांपैकी एक होत आहेत जे आपल्या करीयरच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात देखील यशस्वी झाले. 2000 नंतर आपल्या अभिनयाच्या दुसऱ्या डावात त्यांनी काही चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या व त्या प्रेक्षकांना भावल्या त्यातील हम-तुम, फना, नमस्ते लंडन, अग्निपथ, औरंगजेब, डि-डे हे सिनेमे विशेष गाजले.अभिनय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर त्यांनी निर्माता, निदर्शक म्हणून त्यांनी आ-अब लोट चले या एकमेव सिनेमाची निर्मिती केली.

ऋषी कपूर हे, कपूर खानदान मधील एकमेव अभिनेते त्यांनी राज कपूर ( वडील) तसेच रणधीर कपूर-राजीव कपूर (भाऊ) यांच्या निर्दशनाखाली सिनेमात काम केलेत.ऋषी कपूर यांच्या वैवाहिक आयुष्य बद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा विवाह अभिनेत्री नीतू सिंह यांच्या सोबत झाला.

आपल्या चित्रपटातील भूमिकांसाठी ऋषी कपूर यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेत तसेच 2008 साली त्यांना फिल्मफेअर कडून लाईफटाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ऋषी कपूर यांच्या सिनेकारकिर्दीत त्यांच्या सोबत अनेक अभिनेत्रींनी आपली चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू केली.

आपल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत अनेक चित्रपटात अस्मरणीय भूमिका साकारणारे ऋषी कपूर यांचे निधन 30 एप्रिल 2020 ला रक्ताचा कर्क रोग (Leukemia) या आजाराने झाला.

Note: जर तुमच्याकडे Biography of Rishi Kapoor in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Rishi Kapoor information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button