सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते सुनील दत्त यांचा जीवन प्रवास | Sunil Dutt Biography in Marathi

सुनील दत्त (Sunil Dutt) अर्थात बलराज दत्त यांचा जन्म 6 जून 1930 ला गाव खुर्द, झेलम, पंजाब प्रांत येथे झाले. (वर्तमान भारत) त्यांचा आईचे नाव कुळवंती देवी दत्त आणि वडिलांचे नाव दिवान रघुनाथ दत्त आहे.सुनील दत्त यांचे शालेय शिक्षण हे मुंबई येथील जय हिंद कॉलेज मधुन झाले. तसेच पुढील महाविद्यालय शिक्षण देखील येथूनच पूर्ण केले.

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते सुनील दत्त यांचा जीवन प्रवास | Sunil Dutt Biography in Marathi

सुनील दत्त यांचा सिने कारकिर्दीची सुरुवात 1955 मध्ये आलेल्या ‘रेल्वे प्लेटफॉर्म’ या सिनेमातून झाली. त्यानंतर 1957 मध्ये आलेला मदर इंडिया या सिनेमाने त्यांना बॉलिवूडचे सुपरस्टार बनविले. 1950 च्या दशकात सुरू झालेल्या आपल्या सिने कारकिर्दीत त्यांनी साधना, सुजाता, मुझे जीने दो, गुमराह, वक्त, खानदान पडोसन व हमराज यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटात काम केले.

‘मुझे जीने दो’ व खानदान या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला.1968 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

आपल्या पाच दशकांच्या सिनेकारकिर्दीत त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी निर्देशित केलेले ‘रॉकी’ हा सिनेमा विशेष गाजला. या सिनेमानंतर त्यांनी डाकू और जवान, यादे, दर्द का रिश्ता, आग कब बुझेगी या सिनेमाचे निदर्शक व निर्माण केले. 11 मार्च 1958 ला त्यांचा विवाह सिने अभिनेत्री नर्गिस (Nargis) यांच्यासोबत झाला.

आपल्या अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे राजकीय क्षेत्रातील योगदान देखील महत्त्वाचे आहे. 1984 साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. तसेच 1989 व 1991 च्या निवडणुकीत देखील आपला पारंपारिक उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून निवडून आले. उत्तर पश्चिम मुंबई या आपल्या मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळेस प्रतिनिधित्व केले.

हे वाचा- एकाच सिनेमात 9 भूमिका साकारणारे ‘संजीव कुमार’ यांचा जीवन प्रवास…

2003 मध्ये आलेला मुन्नाभाई एमबीबीएस ह्या त्यांच्या सिनेकारकीर्दीतील शेवटचा सिनेमा ठरला.पूढे 2004 च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी खेल मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली.आपल्या हिंदी सिनेमातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना दादासाहेब फाळके अकॅडमीच्या फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.

25 मे 2005 ला सुनील दत्त यांनी या दुनियेला अलविदा केले. पण आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील तसेच सामाजिक जीवनातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल ते आपल्या नेहमी स्मरणात राहतील.

Note: जर तुमच्याकडे Biography of Sunil Dutt in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Sunil Dutt information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button