10वी नंतर करायचं काय ? गोंधळात पडला असाल तर हि पोस्ट नक्की वाचा- Courses after 10th class

10वी झाल्यानंतर आपल्याला कळत नाही की, आपल्याला नेमकं करायचं काय आहे ? कारण आपण पुढे चालून आपणं एखादी चुकीची फिल्ड निवडली आणि आपलं त्यात मन लागत नसेल, तर काहीच फायदा नाही. तुम्ही पैसे कमवाल पण तुमचं मन लागणार नाही.

दहावी नंतरकरायचं काय हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्या करियर निवडल्याबद्दल मदत करणार आहोत. यासाठी तुम्ही हि पोस्ट नक्की वाचा.

दहावी नंतर करायचं काय ? – Courses After 10th 

10वी नंतर करायचं काय यासाठी कोणकोणते कोर्सेस आहे ते खालीलप्रमाणे दिले आहे.

  • 11वी आणी 12वी PUC  ( pre- University Course )
  • डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्सेस (Diploma in engineering courses)
  • आयटीआय कोर्सेस ( ITI Courses)
  • वेकेशन कोर्सेस (vacation courses)
  • सर्टिफिकेट कोर्सेस (certificate courses)

जर एखाद्या विद्यार्थ्याला 10 वी नंतर नोकरी करायची असेल तर त्याच्यासाठी काही डिप्लोमा आणि पार्टटाईम कोर्सेस आहेत. चांगली परिस्थिती असेल तर त्याने पुढचं शिक्षण नक्की घ्यावे. कारण दहावीनंतर नोकरी केल्यानंतर आपल्याला ठराविक मर्यादेपर्यंत पगार राहील आणि आपल्याला पुढे जास्त काही करता येणार नाही. 

जर तुम्ही दहावीनंतर नंतर चांगले शिक्षण घेतले तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकाल. सरकारी नोकरी सुद्धा करता येणार उदाहरणार्थ पोलीस भरती, रेल्वे भरती आणि नेव्ही यांसारख्या सरकारी नोकरी करता येणार नाही.शक्यतो परिस्थिती चांगली असेल तर 10वी नंतर तुम्ही नोकरीच्या मागे लागू नये.

10वी नंतर तुम्ही 11वी-12वी केली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तीन मुख्य विषय आहेत विज्ञान, कॉमर्स आणि आर्ट्स.एखाद्याला विज्ञान विषयाची खूप आवड असते. एखाद्याला कॉमर्स किंवा आर्ट्सची.

12वी केल्यानंतर तुम्हाला खूप करियर ऑप्शन मिळतात.जर तुम्ही विज्ञान विषय घेतला तर तुम्हाला खूप करिअर ऑप्शन भेटतात तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल मॅनेजमेंट कोर्सेस करू शकता. जर तुम्हीं कॉमर्स घेतल तर तुम्हीं बँकिंग क्षेत्रात करियर करू शकता. जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर तुम्हाला जास्त करिअर ऑप्शन मिळणार नाहीत.

तर चला तर मग जाणून घेऊया की, दहावीनंतर आपल्याला कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस आहेत.

10वी नंतर डिप्लोमा ची लिस्ट – Diploma Courses After 10th

1.लघुलेखन  डिप्लोमा – Diploma in Stenography

हा डिप्लोमा कोर्स विद्यार्थ्यांना शॉर्टहँड डिक्टेशन घेण्यास मदत करतात. म्हणजेच यामध्ये तुम्हाला ऐकून टायपिंग करावी लागते.

कोर्स कालावधी– 1 वर्ष

नोकरी– हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंपनी, न्यायालय, जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय, आयकर विभाग आणि विद्यापीठ मंत्रालय यांसारख्या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

2. आर्ट टीचर डिप्लोमा- Art Teacher Diploma

जर तुम्हाला चित्र काढायला खूप आवडते तर तुम्ही आर्ट टीचरचा डिप्लोमा करू शकता. या मध्ये तुम्हीं व्हिज्युअल आणि डिझाइनचा अनुभव सुद्धा घेऊ शकता.

कोर्स कालावधी-  2 वर्ष

नोकरी – हा कोर्स नंतर तुम्ही आर्ट टीचर बनू शकता.

3. कृषी तंत्रज्ञान पदविका – Diploma in Agriculture

भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहेत देशाच्या विकासात या क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मला शेती करण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून आधुनिक शेती करू शकता.

कोर्स कालावधी – 2 वर्ष

नोकरी– हा कोर्स केल्यानंतर तुम्ही बीटेक एग्रीकल्चर इंजिनियर मध्ये करिअर करू शकता.

4. कमर्शियल आर्ट डिप्लोमा – Commerical Art Diploma

हा डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीची संकल्पना सहजपणे समजता येणार आहे. हा कोर्स फाइन आर्ट कोर्स पेक्षा एकदम वेगळा आहे.

कोर्स कालावधी– 2 ते 3 वर्ष

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग कंपनी, आर्ट स्टुडिओ पब्लिशिंग हाउसेस,  फॅशन हाऊसेस या मध्ये नोकरी मिळू शकते.

5. ॲनिमेशन डिप्लोमा – Diploma in Animation

सध्याच्या युगात या कोर्सेची मागणी खूप वाढली आहे. कारण आजच जग हे पूर्णपणे डिजिटल झालं आहे. त्यात थ्रीडी ॲनिमेशन कोर्स हा तुमच्यासाठी बेस्ट राहिलं.

कोर्स कालावधी – 18 महिने ते 2 वर्ष

नोकरी -हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ॲनिमेशन कंपनी मध्ये जॉब मिळू शकतो.

6. हॉटेल मॅनेजमेंट – Diploma in Hotel Management and Catering Technology

ज्यांना फूड खाण्यात आणि खाऊ घालण्यात आवड आहे. त्यांनी हा कोर्स केला पाहिजे.

कोर्स कालावधी– 2 वर्ष

नोकरी– हा डिप्लोमा केल्यानंतर केटरिंग ऑफिस, केटरिंग सुपरवायझर & असिस्टंट आणि  कॅबिन क्रू यामध्ये नोकरी मिळू शकते.

7. ब्युटी केअर- Diploma in Beauty care

हा कोर्स मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे.या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ब्युटी केअर बद्दल खूप काही शिकायला मिळणार आहेत या मुला-मुलींना ब्युटी केअर मध्ये आवड आहे त्यांनी हा कोर्स केला पाहिजे.

कोर्स कालावधी– 4 वर्ष

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःच ब्युटी पार्लर सुद्धा चालू करू शकता. किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ब्युटिशन म्हणून सुद्धा नोकरी कर शकता.

8. कॉस्मेटोलॉजी डिप्लोमा – Diploma in Cosmetology

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉस्मेटिक मध्ये खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता येणार आहे.

कोर्स कालावधी– 5 महिने

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ब्युटिशन बनू शकतो किंवा स्वताच पार्लर सुद्धा टाकू शकता. हा कोर्स पूर्णपणे ब्युटी केअर डिप्लोमा सारखाच आहे. किंवा एखाद्या मोठ्या कॉस्मेटिक बनवणाऱ्या कंपनीमध्ये सेल्समॅन म्हणून सुद्धा नोकरी करू शकता.

9. सायबर सिक्युरिटी- Diploma in Cyber Security

Cyber security या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी एथिकल हॅकिंग संबंधित सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे.

कोर्स कालावधी – 1वर्ष

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट एजन्सीमध्ये इथिकल हॅकिंग म्हणून काम करू शकता.

10. कमर्शियल प्रॅक्टिस – Diploma in Commercial Practice

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एखादी वस्तू कशी विकायची आणि तिचं प्रमोशन कसं करायचं हे तुम्ही या कोर्समध्ये शिकणार आहात.

कोर्स कालावधी – 3 वर्ष

नोकरी– डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला कमर्शियल अकाउंट मॅनेजर, कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, बिझनेस ज्युनिअर हेड, ब्रांच ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. यांसारखे पद तुम्हाला मार्केटिंग कंपनीमध्ये मिळू शकतील.

11. डेंटल डिप्लोमा – Diploma in Dental Mechanics

Dental डिप्लोमा कोर्स केल्यानंतर दवाखान्यात पेशंटसाठी लागणाऱ्या प्रायमरी ट्रीटमेंट काय काय आहेत हे या मध्ये शिकण्यास मिळणार आहे.

कोर्स कालावधी– 2 वर्ष

नोकरी– हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला डेंटिस्ट, असिस्टंट डेंटल सर्जन,डेंटल टेक्निशिअन आणि रिसर्च असिस्टंट यांसारख्या पदावर तुम्हाला काम करायला मिळणार आहे.

हे सुध्दा वाचा:- 12वी नंतर काय करायचं ? असा प्रश्न पडला असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी

12. प्लास्टिक टेक्नॉलॉजी- Diploma in plastic Technology

परत वापरले जाणारे वस्तूंची यादी करायला बसलो तर दिवस पुरणार नाही. 99% आज आपण प्लास्टिकचा वापर करतोय.

प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स खूप फायदेशीर ठरणार आहे.

कोर्स कालावधी– 3 वर्ष

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्लास्टिक पार्ट मॉडल डिझाईन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर,इंडस्ट्रिअल इंजिनिअर आणि प्रॉडक्ट डिझाईन इंजिनियर यांसारख्या पदांवर काम करायला मिळणार आहे.

13. सिरॅमिक डिप्लोमा – Diploma in Ceramic Technology 

सिरामिक डिप्लोमा मध्ये तुम्हाला मातीपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू कश्या प्रकारे बनवल्या जातात. हे तुम्हाला या डिप्लोमा कोर्समध्ये शिकण्यास मिळणार आहे. हे क्षेत्र पण खूप मोठ्या प्रमाणात वाढल आहे. 

कोर्स कालावधी – 3 वर्ष

नोकरी – जर तुम्हाला सिरॅमिक टेक्नॉलॉजीमध्ये इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता.

14. फायर सेफ्टी इंजीनियरिंग – Diploma in Fire safety engineering

या कोर्सच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की, आपल्याला नेमके या कोर्समध्ये काय शिकायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला आग लागल्यानंतर काय करावं लागणार आहे. साठी कोणते इन्स्ट्रुमेंट कसे वापरायचे ते सुद्धा तुम्हाला या डिप्लोमा कोर्समध्ये शिकण्यास मिळणार आहे.

कोर्स कालावधी – 6 महिने

नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला फायर सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करता येणार आहे.

15. फॅशन टेक्नॉलॉजी – Diploma in Fashion Technology

सर्वात पहिले तर फॅशन डिझाईन आणि फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये खूप फरक आहे.फॅशन डिझाईन मध्ये तुम्ही खूप कर मोठ्या लेवल मध्ये करियर करू शकता. फॅशन टेक्नॉलॉजी कोर्स केल्यानंतर तुम्हाला फक्त एखाद्या गारमेंट कंपनीमध्ये काम करू शकता. 

कोर्स कालावधी– 3 वर्ष

नोकरी– फॅशन डिझायनर, कॉस्ट्यूम डिजायनर, टेक्सटाइल डिजायनर यांसारख्या पदांवर तुम्ही काम करू शकता.

16. डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्सेस (पॉलिटेक्निक) – Diploma in engineering courses (Polytechnic )

दहावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात डिप्लोमा देखील करू शकता. विद्यार्थ्यांना दहावी मध्ये गणित व विज्ञान विषय असणं बंधनकारक आहे.

10वी नंतर तुम्ही कोणकोणते फिल्ड मध्ये डिप्लोमा करू शकता. हे खालील प्रमाणे दिले आहे.

  1. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर
  2. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर
  3. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर
  4. डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअर
  5. डिप्लोमा इन कंप्यूटर इंजिनियर
  6. डिप्लोमा इन  टेक्स्टाईल इंजिनिअर
  7. डिप्लोमा इन मेडिकल इंजिनियर
  8. डिप्लोमा इन केमिकल इंजिनियर

तीन वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही बीटेक आणि बीई साठी ॲडमिशन घेऊ शकता. हा कोर्स केल्यानंतरतुम्हाला इंजिनियरिंगच्या डायरेक दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळणार आहे.

17. आयटीआय कोर्स – ITI Courses

आय टी आय म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटया कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल लेवला कशाप्रकारे काम करायचं आहे या या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. ह्या कोर्समध्ये लिखानापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज वर जास्त भर देतात. या आय टी आय कोर्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. ते कोण कोणते कोर्स आहेत ते खालीलप्रमाणे जाणून घेऊया. हा आयटीआय कोर्स सुद्धा एक ते दोन वर्ष करता आहे.

  • आय टी आय इलेक्ट्रिशियन कोर्स
  • आयटीआय प्लंबर कोर्स
  • आयटीआय वेल्डर कोर्स
  • आयटीआय टर्नर कोर्स
  • आयटीआय मेकॅनिकल कोर्स

आयटीआयचा कोर्स केल्यानंतर सुद्धा तुम्ही डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्स सुद्धा करू शकता. म्हणजेच त्याला आपण पॉलीटेक्निक असं म्हणतो.

18. सर्टिफिकेट कोर्स – Certificate Courses

वरती दिलेल्या कोर्सच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही दुसरे काही सर्टिफिकेट कोर्स आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे कोर्स तुम्ही दहावीनंतर सुद्धा करू शकता.

  • वेब डिजाइनिंग कोर्स
  • एथिकल हैकिंग कोर्स
  • ट्राफिक डिझाईन
  • ॲप डेव्हलपमेंट

वरील दिलेल्या कोर्स पैकी तुमच्या आवडीचा कोणता कोर्स आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीत आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही कोर्स करा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button