आज आपण जागतिक वारसा दिनाबद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना माहीत नाहीये की जागतिक वारसा दिवस म्हणजे काय. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक वारसा दिवस माहिती – World heritage day information in marathi
जगभरातील अनेक गुहा, मंदिर, चर्च, स्मारके, किल्ले अशा अनेक गोष्टी त्या त्या काळातील वारसा म्हणून ठेवून गेले. त्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी आणि पुरातन गोष्टी जतन व्हाव्यात यासाठी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. संस्कृतीचे संरक्षण व्हावे या हेतूने स्मारक व वारसास्थळे यांच्या आंतरराष्ट्रीय समितीने 1982 झाली हा दिवस घोषित केला. ज्याला UNESCO ने मान्यता दिली. अभिमानाची गोष्ट आहे की, United nations educational, scientific and cultural orgnization म्हणजेच UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या स्थानांपैकी भारतामधील 36 वेगवेगळे स्थळे आहेत.
यामुळे वारसा स्थळांच्या जगातील क्रमवारीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. या 36 स्थळांपैकी 7 नैसर्गिक आणि 28 सांस्कृतिक आणि एक मिश्र स्वरूपाचे स्थळ आहे. भारतातील निसर्ग आणि संस्कृतीचा उच्च वारसा लाभला आहे. आपली वने, सरोवरे,नद्या आणि वन्यजीव सृष्टी यासारखे नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे आपल्याला संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मुल जाणून ते जतन करणे ही आपली मूलभूत कर्तव्य आहेत.
जर आपण स्वतः या गोष्टी जतन करून ठेवल्या तर आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा व्यवस्थितपणे सांगू शकतो आणि त्यांना कसे सांभाळून ठेवावे हे सुद्धा त्यांना सांगू शकतो. अर्थात आजचा दिवस हा मानवनिर्मित वारसा म्हणून साजरा केला जातो.
भारतात आतापर्यंत युनेस्कोने एकूण 36 वारसास्थळे जाहीर केले आहेत. त्यातील सहा महाराष्ट्रातील आहे ते आपण जाणून घेऊया.
कोणती आहेत ती महाराष्ट्रातील वारसास्थळे
1 अजिंठा लेणी
लेण्या म्हटलं की आपल्याला आठवतो तो अजिंठा आणि वेरुळ चा भाग म्हणूनच भारताचा वारसा यादीत सर्वात पहिल्या स्थानावर आहे अजिंठा येथील बौद्ध लेण्या. जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आपले आयुष्य गौतम बुद्ध आणि त्यांच्या लाखो शिष्यांनी व्यतीत केले आहे. असा संदेश देणारे ह्या लेण्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात येतात. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन सन 480 ते 650 व्या शतकापर्यंत बांधण्यात आल्या होत्या.
2 वेरूळ लेणी
भारतातील यादीत दुसरे वारसा स्थान आहे ते म्हणजे वेरूळ लेणीचा. ही लेणी सुद्धा बुद्ध धर्मियांच्या आहेत. तसेच काही लेने ह्या तत्कालीन हिंदू व जैन धर्मियांनी खेदल्याचेही पुरावे सापडले आहेत. येथील कैलास मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. ही लेणी औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावात आहे. ही सह्याद्रीच्या सातमाला पर्वतरांगेतील डोंगर कड्यात साधारणतः पाचव्या ते सहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 36 लेण्या आहेत. यामध्ये 12 बौद्ध ( लेणी क्रमांक1-12), 17 हिंदू ( लेणी क्रमांक 13-29) आणि 5 जैन ( लेणी क्रमांक 30-34) लेणी आहेत.
3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( विक्टोरिया टर्मिनस)
छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ,विक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) हे मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय सुद्धा आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इसवी सन. 1887 मध्ये विक्टोरीया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले होते.
4 विक्टोरियन गोथिक बिल्डिंग समूह,मुंबई
दक्षिण मुंबईच्या या भागातील इंग्रजांनी बांधलेले शेकडो इमारती अजूनही सुरक्षित आणि सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही इमारतींचे एक समूह विक्टोरिया बिल्डिंग समूह या नावाने ओळखला जातो. या सर्व बिल्डींग म्हणजे बॉम्बे हायकोर्ट राजाबाई चौक टावर, एरोस सिनेमा आणि मुंबई विद्यापीठ या इमारतीच्या त्यामध्ये समावेश आहे.
5 घारापुरी लेणी
घारापुरी लेणी च अजून एक नाव आहे ते म्हणजे एलिफंटा लेणे महाराष्ट्र मधील मुंबई पासून सहा-सात किलोमिटर अंतरावर समुद्रातील घारापुरीतील लहान बेटावर डोंगराळ भागात ही लेणी स्थित आहे. येथील त्रिमूर्ती शिव व कल्याण सुंदर शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी पर्यटन महोत्सव भरविण्यात येतो. सण 1987 झाली युनेस्को या वारसा स्थळाला नेसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
6 कास पठार
कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा आपलं नाव कोरल आहे.. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे.
Note – जर तुम्हाला World heritage day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि twitter वर शेअर करा