मक्का खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Corn health benefits in marathi

मित्रांनो तीन ते चार हात उंच मक्याच्या रोपांना जास्तीतजास्त तीन कणसे लागतात. सर्व धान्यांमध्ये आकाराने मोठे असणाऱ्या कणसाचे दाणे पिवळ्या किंवा क्वचित लाल रंगाचेही असतात. मक्याची कोवळी कणसे ‘बुट्टे (sweet corn)‘ विस्तवावर खरपूस भाजून त्यावर लिंबू पिळून व मीठ लावून खाल्ल्यास एक वेगळाच आनंद मिळतो. सर्वसाधारणपणे मक्याचे पीठ करून त्यापासून भाकरी बनवली जाते. पंजाबातच अशी ‘मक्के दी रोटी’ खूपच लोकप्रिय आहे. भाकरीबरोबरच मक्याच्या पिठापासून वडे, ढोकळेही बनवले जातात. मक्यापासून पोहे व चिवडाही बनवला जातो. मक्याचे दाणे शेकून केलेल्या लाह्या अर्थात ‘पॉपकॉर्न’ आबालवृद्धांच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत.

मक्का खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Corn health benefits in marathi

  • मक्याची भाकरी पचण्यास जड, वायूकारक व रूक्ष असते.
  • मक्याचे दाणे रूक्ष, गोड, कफ-पित्तहारक, रुचकर, वायूकारक व थंड असून मळ बांधण्यास मदत करतात.
  • मक्याची दाणेविरहित कणसे जाळून त्याची राख बंद डब्यात ठेवावी. कोणासही उलटी होत असल्यास उलटी बंद व्हावी म्हणून ती मधामध्ये घालून चाटावी.

हे सुध्दा वाचा: ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यापासून ते पचनक्रिया निरोगी ठेवण्यापर्यंत जाणून घ्या खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे?

  • कणसाची राख दिवसांतून दोनवेळा पाण्यातून घेतल्यास मुतखडा झाला असता फायदा होतो.
  • ज्यांची पचनशक्ती कमजोर, दुर्बल आहे अशांनी मका खाणे टाळावे. मक्याच्या सेवनाने शरीरातील नसा शिथिल व कमकुवत होतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button