गव्हाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Wheat health benefits in Marathi

गहू (Wheat) हा आपल्या आहारामधील अत्यावश्यक घटक आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये गव्हाच्या पोळ्या असतातच. गहू अत्यंत पौष्टिक धान्य आहे. भारतात गव्हाचे पीक सर्वत्र येते. गव्हाचे दाणे असतात. दीड दोन फूट लांबीच्या गव्हाच्या रोपांच्या हिरव्या लोंब्या भाजून केलेला चविष्ट हुरडाही अत्यंत छान लागतो. गव्हाचे वजनदार, हलका, लाल व पांढरा असे प्रकार पडतात. लाल गहू अत्यंत समृद्ध व पौष्टिक घटकांचा अंतर्भाव असलेला असतो.

गव्हाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Wheat health benefits in Marathi

 • गव्हापासून येणाऱ्या पिठाच्या पोळ्या बनवून खाल्ल्या जातात तसेच हलवा, शिरा, मालपुवा, पुरणपोळी, धिरडी, जिलेबी, लाडू आदी पक्वान्नांमध्ये तर शेव, बिस्किटे, केक, पाव, भाकरी, पुरी आदी पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा गव्हाच्या पिठाचा उपयोग होतो.
 • आहारात रोज गव्हाचे पदार्थ खाल्ले तरी चालते. मात्र नवा गहू पचावयास जड़ व कफकारक असल्याने त्याचा उपयोग टाळावा. वसंतऋतूत गहू खावा मात्र तो पचण्यास जड असल्याने पावसाळ्यात बेतानेच खावा.
 • गहू गोड, पचावयास जड, थंड, वायू व पित्तनाशक, कफकारक, बलदायी, वीर्यवर्धक, पुष्टीकारक, रुचकर, स्निग्ध आहे. गव्हाची कोवळी रोपे सुद्धा पौष्टिक असतात. या रोपांचा रस पित्तशामक, वायुनाशक, रक्तवर्धक, बलवर्धक, शुक्रधातूवर्धक असतो. पित्तविकार, रक्तविकार, आतड्यांतील व्रण, शुक्रक्षय, रक्तक्षय, मूत्रावरोध, रक्तविकार, उष्णता, आम्लपित्त, दाह, जीर्णज्वर यांमध्ये गव्हाच्या रोपांचा रस नित्य सेवन केल्यास फायदेशीर ठरतो.
 • प्रमेहाचा त्रास झाला असता 100 ग्रॅम गहू दीड ग्लास पाण्यात भिजत घालावेत. सकाळी बारीक वाटून त्यात दोन चमचे साखर घालून आठवडाभर घेतल्याने प्रमेह दूर होते. गळू झाल्यास त्यावर गव्हाचे पोटीस बांधल्याने गळू पिकून फुटते.
 • पांडुरोग तसेच कफविकारांमध्ये गव्हाचे सत्त्व द्यावे.

हे सुध्दा वाचा: या 4 सवयींमुळे तुमच्या पोटाची चरबी वाढते, त्वरित सुटका करण्यासाठी हे उपाय करा

 • नाकाचा घोळणा फुटल्यास गव्हाच्या पिठात साखर व दूध घालून घेतल्याने वाहणारे रक्त थांबते.
 • लठ्ठ माणसांनी आहारात गव्हाची चपाती (तेल, तुपाशिवाय) खावी. गव्हामध्ये चरबीचा अंश कमी असतो.
 • गव्हाच्या पिठात दूध, तूप, किंचित मीठ घालून ते पीठ चांगले मळून घ्यावे व त्याचे जाडसर पराठे रोजच्या जेवण्यातून घ्यावे. दमा, खोकला, वीर्यदुर्बलता, अशक्तता यांवर ते फायदेशीर ठरतात.
 • शरीरास बल व पुष्टी येण्यासाठी गव्हाचे पीठ दुधात कालवून त्यात मध, खडीसाखर, साजूक तूप घालून शिजवावे व रोज सकाळी खावे.
 • गहू टिकवून ठेवण्यासाठी त्यात कडुनिंब किंवा मेथीची सुकलेली पाने घालावीत.
 • गहू पचण्यास जड असतो त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशांनी याचे सेवन जपूनच करावे.
 • तापाचा जोर वाढल्यास, जुलाब-मुरडा होत असल्यास, अग्निमांद्याचा विकार असल्यास, पोटात गुबारा धरल्यास गव्हाचे सेवन टाळावे. कफ, संग्रहणी, उदररोग या विकारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी तसेच बाळंतिणींनीही गव्हाचे सेवन टाळावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button