गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यातील फरक काय? | What is the difference between an investor and speculator?

मित्रांनो शेअरबाजारात दोन प्रकारचे लोक आपल्याला आढळतील एक म्हणजे गुंतवणूकदार आणि दुसरे म्हणजे सट्टेबाज.

गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यातील फरक काय? | What is the difference between an investor and speculator?


ज्यांच्याकडे शेअर घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत आणि ज्यांना शेअरची डिलिव्हरी घेऊन वाट पाहण्याची ताकद आहे असे लोक म्हणजे गुंतवणूकदार! योग्य संधी मिळेपर्यंत ते त्या शेअरची विक्री करत नाहीत.दुसऱ्या बाजूला सट्टेबाज. म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे शेअर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे असतीलच असे नाही आणि ज्यांना शेअरची डिलिव्हरी घेऊन वाट पाहण्यात फारसं स्वारस्य नसतं.

तेजीच्या दिवसांत खरेदी आणि विक्री यांतील फरकाने मिळणार फायदा आणि विक्री यांतील फरकाने मिळणार फायदा चटकन खिशात टाकायचा आणि काही वेळेस अंदाज चुकला तर तोट्याची रक्कम खिशातून पटकन देऊन टाकायची असा त्यांचा दृष्टिकोन असतो. मित्रांनो एक पोस्ट माध्यमातून तुम्हाला हेच आवाहन करतो कि, त्यांनी गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला जर सट्टेबाज व्हायचं असेल तर त्यातील धोके आणि जोखीम पूर्णपणे समजावून घ्या आणि नंतरच निर्णय घ्या.

हे वाचा- शेअरबाजार आणि इतर बाजारात महत्त्वाचा फरक काय?

आपण घेत असलेल्या शेअरचा मूलभूत अभ्यास करायचा आणि तो सध्या योग्य किमतीला उपलब्ध आहे का याचा अंदाज घ्यायचा यावर गुंतवणूकदार लोकांचा भर असतो, तर सट्टेबाज लोकांना जुगार खेळायला आवडतं. बहुतेक वेळा शेअरचा मूलभूत अभ्यास करण्यापेक्षा बाजाराचा कल आणि मूड बघून निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो. येणाऱ्या काही दिवसांत एखाद्या शेअरचा बाजारभाव वाढणार आहे असं वाटल्यास सट्टेबाज लोक त्या शेअरमध्ये जो व्यवहार करतात त्याला तांत्रिक भाषेत ‘फॉरवर्ड ‘ट्रेडिंग’ किंवा ‘लॉग पोझिशन’ म्हणतात. याउलट सट्टेबाजांना एखादा शेअर नजीकच्या दिवसांत पडणार असं वाटतं तेव्हा त्या शेअरमध्ये ते जो व्यवहार करतात त्याला ‘शॉर्ट ‘सेलिंग’ किंवा ‘शॉर्ट पोझिशन’ म्हणतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ