‘कमोडिटी ट्रेडिंग’ म्हणजे काय? | What is commodity trading in marathi

शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंग च्या व्यतिरिक्त कानावर पडणारा आणखी एक शब्द म्हणजे कमोडिटी ट्रेडिंग.

कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय? | What is commodity trading in marathi

कमोडिटीज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू ज्यांची ट्रेडिंग कमोडिटी ट्रेडिंगमध्ये केली जाते. यामध्ये काही शेतीमाला विषयक वस्तू असतात ज्यांना ॲग्री कमोडिटी असे म्हटले जाते आणि बाकीच्या वस्तूंना नॉन अॅग्री कमोडिटी म्हटले जाते. कमोडिटी मार्केटमध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या वस्तूंचे ट्रेडिंग केले जाते.

  • अग्री कमोडिटीज (Agri Commodities) – कापूस, इलायची, काळी मिरी, सोयाबीन, साखर, एरंड, मका, बार्ली इत्यादी.
  • बेस मेटल्स झिंक, कोपर, ॲल्युमिनियम, लेड, निकेल.
  • मौल्यवान धातू – सोने, चांदी
  • एनर्जी – क्रूड ऑइल, नॅचरल गॅस

ज्याप्रमाणे स्टॉक एक्सचेंज वर स्टॉक ची खरेदी आणि विक्री होते त्याचप्रमाणे कमोडीटी एक्सचेंज वर कमोडिटी ची खरेदी आणि विक्री होते. कमोडिटी ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्ट हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतात पण त्यांचा अवधी स्टॉक च्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पेक्षा अधिक असतो. कमोडिटी ट्रेडिंग मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर केली जाते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *